Monday, May 27, 2024

गोंडेगाव येथे उद्या स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

 

नेवासा(तालुका प्रतिनिधि):– तालुक्यातील गोंडेगाव येथे सूरु असलेल्या  अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे सांगतानिमित्त शुक्रवार दि.17 मे रोजी सकाळी 9 वाजता श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन कीर्तन होणार आहे.

 

काल्याचे किर्तना नंतर प्रविण गारुडे, सौरव वाघुले, किशोर वाघुले, कृष्णा तुपे यांचे कडून उपस्थित भाविकांना महाप्रसादाची पंगत देण्यात येणार आहे.

गोंडेगाव परिसरातील भाविकांनी काल्याचे कीर्तन श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थ व भजनी मंडळाने केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!