Monday, May 27, 2024

नगर आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज राज्यामध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे. दुहेरी वातावरण पाहायला मिळतंय. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

नगर आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.त्यानुसार नगर आणि नाशिकमध्ये आज मेघगर्जना आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या

वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट (Maharashtra Rain Update) दिला आहे. तर मुंबई शहर, मुंबई उपनगरासह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाटसदृश वातावरणाचा इशारा कायम असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेसाठी येलो अलर्ट आयएमडीने दिला आहे. नगर आणि नाशिकमध्ये गारपीट (Hailstorm Forecast) तर नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली. जळगाव, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, धाराशिव, लातूर, धुळे, सांगली, सोलापूर,

कोल्हापूर, (Maharashtra Weather Update) हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा कायम आहे.पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे. मुंबईत मात्र उकाडा कायम राहणार आहे. राज्यात जुनच्या पहिल्या

आठवड्यातच मोसमी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता (Heat Wave Alert) आहे. तर १९ मेपर्यंत मान्सून अंदमानमध्ये दाखल होऊ शकतो. ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी शीतल वातावरण आहे. परंतु उकाड्यापासून पुर्णपणे अजून सुटका झालेली नाही.

वादळी वाऱ्याचा अंदाज असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!