Sunday, October 24, 2021

नगर जिल्ह्याच्या या दिग्गज नेत्यांच्या आणि निधनाने शरद पवारांना बसला धक्का

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मोठे नाव म्हणून समजले जाणारे प्रा. तुकाराम दरेकर यांचे निधन काही दिवसापूर्वी  झाले आणि त्यांच्या या निधनामुळे शरद पवारांना चांगलाच धक्का बसला आहे त्यांनी एक शोक संदेश पाठवलेला आहे.त्यात त्यांनी सांगितले की नेहमी संपर्कात असलेले आणि अचूक माहिती देणारे अहमदनगर जिल्ह्यातील

श्रीगोंद्याचे प्रा. तुकाराम दरेकर यांचे निधन झाल्याची माहिती समजली आणि मला धक्काच बसला. प्रा. दरेकर यांचे नाव राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या यादीत वरच्या क्रमांकावर होते. त्यांच्या रुपाने श्रीगोंद्यातील राजकीय चाणक्य, सहकारी हरपला, असा शोक संदेश जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठवला आहे.

या शोक संदेशाचे वाचन प्रा. तुकाराम दरेकर यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमात करण्यात आले. पवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे, प्रा. दरेकर हे शेती, शेतकरी, तरुण पिढी यांच्या भल्यासाठी काम करीत. कुठे अन्याय होत असेल तर संघर्ष करण्यासाठी ते पुढे असत.

श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्यामध्ये अनेक वर्षे उपाध्यक्ष, संचालक होते. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांचा सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांची जी रयत बँक आहे, त्या बँकेवरसुध्दा ते अनेक वर्षे काम करत होते. सहकार, शिक्षण, शेतकी अशा विविध क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. त्यांच्या निधनाने आम्ही एका चांगल्या सहकाऱ्याला मुकलो.

दरेकर कुटुंबीयांवर फार मोठा आघात झाला आहे, अशा शब्दांत पवार यांनी दु:ख व्यक्त केले.यावेळी भगवान महाराज गिरमकर, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, मनोहर पोटे, केशव मगर, जिजाबापू शिंदे, राजेंद्र म्हस्के, प्रकाश कुतवळ, रावसाहेब खेडकर, सुनिल भोस, स्मितल वाबळे,

मनोहर शहाजी मखरे, बाबासाहेब इथापे, पोपटराव खेतमाळीस, संजय जामदार, शरद यादव यांनी श्रध्दांजली अर्पण केली.दरेकर यांच्या दशक्रिया विधीनिमित्त गणेश महाराज शिंदे यांचे प्रवचन झाले.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...

नगर जिल्ह्यात उद्यापासून खडी क्रशर, खाणपट्टा सोमवारपासून बंद ?

माय महाराष्ट्र न्यूज: खडी क्रशर, खाणपट्टा धारकांवर जाचक अटी राज्य सरकारकडून घातल्या आहेत. त्या मागे घ्याव्यात. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात रॉयल्टी दर कमी करण्याची मागणी...
error: Content is protected !!