Saturday, October 23, 2021

नगर ब्रेकिंग:हॉटेल राजयोग मधील कुंटणखान्यावर छापा; 3 परप्रांतीय मुलींची

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर तालुक्यातील हॉटेल राजयोगमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून तीन परप्रांतीय मुलींची सुटक करुन दोनजणांना अटक करण्यात आली आहे. ही धडकेबाज कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांना नगर तालुक्यातील खंडाळ गावाच्या शिवारात नगर ते दौड जाणारे रोडच्या बाजूला असणारे हॉटेल राजयोगमध्ये मालक अनिल माणीकराव कर्डीले (वय 52) व अक्षय अनिल कर्डीले (वय 25. दोघे रा – खंडाळा ता.जि.अ.नगर)

ही दोघे संगनमताने आपले स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी हॉटेलमध्ये परप्रांतीय मुलीना देहविक्री करण्यासाठी बोलावून घेऊन त्याचे मार्फतीने गैरमार्गाने देहविक्री करुन कुंठणखाना चालवीत आहे, अशी माहिती मिळाली होती, या माहितीनुसार श्री पाटील यांच्यासह नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या पोलीस पथकाने छापा टाकला.

या छाप्यामध्ये तीन परप्रांतीय मुली मिळवून आल्या. त्याना स्नेहालय येथे पाठवले आहे. दरम्यान, हाॅटेल मालक व मुलगा याना पिटा कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. 500 रु.दराच्या 14 नोटा व 100 रु.दराच्या 15 नोटा असे एकुण 8 हजार 500 रुपयांचे जप्त करण्यात आले आहे.

हाॅटेल मालक व मुलगा यांना अटक करून नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोउपनि दिलीप बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.रजि.नं. 385/2021 स्त्रीया व मुलींचा अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा सन 1956 चे कलम 3,4,5 प्रमाणे नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!