Friday, October 22, 2021

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या पदार्फाश महिला एजंटला अटक, तीन मुली ताब्यात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नागपूरमध्ये सेक्स रॅकेट  चा पदार्फाश झाला आहे. या सेक्स रॅकेट प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणींना ताब्यात घेतले असून एका महिला सेक्स रॅकेट  एजंटला अटक करण्यात आली आहे.नागपुरातील मनिषनगरमधील दिलीप रेसिडेन्सी इमारतीतील पॉश फ्लॅटमध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होतं.

34 वर्षीय प्रियंका शोएब अफजल सैय्यद असं महिला एजंटला अटक केली आहे.कुख्यात महिला एजंट गेल्या अनेक दिवसांपासून सेक्स रॅकेटमध्ये अॅक्टिव्ह होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी महिला एजंट तरुणींना आणि अल्पवयीन मुलींना झटपट पैसे कमवण्याचं आमिष दाखवायची आणि या रॅकेटमध्ये ढकलायची.

तरुणींचे फोटो पाठवून ती ग्राहकांना आकर्षित करायची. गेल्या काही दिवसांपासून तिनं मनिष नगरमधील दिलीप रेसिडेन्सी अपार्टंमेंटमधील 401 क्रमाकांच्या फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट सुरु केला होता, पोलिसांनी अशी माहिती दिली आहे.गेल्या काही दिवसांपासून फ्लॅटवर अनेक तरुणींची होणारी गर्दी पाहता शेजाऱ्यांना संशय आला. शेजारच्यांनी सामाजिक सुरक्षा विभागाचे पीआय ज्ञानेश्वर भोसले यांना

यांसंबंधित माहिती दिली. शनिवारी त्यांनी सेक्स रॅकेट सुरू असल्याची खात्री केली. त्यानंतर सापळा रचला. पोलिसांनी एक पंटर पाठवून मुलींची मागणी केली. त्यावेळी प्रियंकानं 5 हजार रुपयांत मुलीचा सौदा केला. काही वेळात तरुणीला आणि पंटरला रुममध्ये पाठवण्यात आलं. त्यानंतर पंटरनं इशारा करताच दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी फ्लॅटवर छापा घातला.

फ्लॅटमधील अन्य तीन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या तिन्ही तरुणी गरीब घरातील आहे. त्यातील एक तरुणी ब्युटी पार्लरला कामाला होती. या प्रकरणी पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिला एजंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!