Monday, October 18, 2021

नगर ब्रेकींग :प्रतिष्ठीत व्यक्तीवर संगमनेरच्या महिलांचा हनीट्रॅप ब्लॅकमेल करत मागितली तीन लाखांची खंडणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात सेक्स कॅन्डल चालविणार्‍या महिला आहेत. प्रतिष्ठीत व धनबलाढ्या व्यक्तींना प्रेमाच्या जाळ्यात फसवायचे आणि त्यांचे अश्लिल व्हिडिओ काढून त्यांनाच ब्लॅकमेल करायचे. थोडी ना थिडकी लाखो रुपयांची मागणी करायची आणि नाही दिली तर चार चौघात मारहाण करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दहशत निर्माण करायची.

त्यामुळे, प्रतिष्ठेपोटी कोणताही पुरुष नम्र होऊन या हनी ट्रॅपचा बळी जातो. मात्र, अकोल्यातील एक व्यक्तीने केवळ आपण बळी गेलो म्हणून अन्य तरुण आणि पुरूष अशा महिलांचे शिकार होऊ नये. यासाठी पुढे येऊन स्वत: फिर्यादी होत महिलांसह ट्रॅपचा कट रचणार्‍या तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी उघड केला असून

मुळत: ज्या व्यक्तीने फिर्याद दाखल केली. त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. आता अशा प्रकारे जर कोणाची फसवणुक झाली असेल तर त्यांनी स्वत: पुढे येऊन अकोले पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन घुगे यांनी केले आहे. पुढे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे नाव गोपनिय ठेवले जाईल अशी शाश्वती पोलिसांनी दिली आहे.याबाबत घडलेली सविस्तर माहिती अशी की, संगमनेरच्या एका महिलेने अकोले तालुक्यातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीला फोन केला.

साहेब.! जेवण झाले का? चहापाणी झाले का? अशी विचारणा करुन थेट लागट सुरू केली. तेव्हाच या व्यक्तीला संशय आला की, ओळख ना पाळख ही महिला असे का म्हणते आहे. त्यानंतर यांच्यात चर्चा झाली. कालांतराने व्हाटसअ‍ॅप चॅटींग आणि लागलीच एक महत्वाचे काम आहे असे म्हणून आठवड्याभरात संगमनेर येथे भेटण्यासाठी बोलविले. सहज भेट म्हणून हे गृहस्त संगमनेरला गेले असता या महिलेने त्यांना तालुक्यातील एका हॉटेलमध्ये बोलविले.

त्यावेळी हे गृहस्त गेले असता तेथे दोन महिला दारु पीत बसल्या होत्या. त्यांनी विचारले तुमचा ब्रँण्ड कोणता? मात्र, हा व्यक्ती माळकरी असल्यामुळे, त्यांना हा प्रकार काही पटला नाही. ते तत्काळ तेथून चालते झाले.तुम्ही जर माझ्या मैत्रीणीशी आम्ही सांगू तसे केले नाही. तर आम्ही येथेच आरडाओरड करू आणि लोकांना सांगू की, तुम्ही आमच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही संभोग केला नाही तर लगेच पोलिसांना बोलावून

तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करु. त्यामुळे, अखेर हतबल होऊन या व्यक्तीकडून नको ते कृत्य करून घेतले. हा प्रकार घडल्यानंतर ते त्यांच्या घरी निघून आले. मात्र, मागे भलताच पराक्रम घडला होता. या ब्लॅकमेलीग करणार्‍या महिलांनी या गृहस्थाचा एक अक्षेपहार्य व्हिडिओ काढला होता. रात्रीपासूनच या महिलांनी त्यांना ब्लॅकमेलीग करण्यास सुरूवात केली. दोन लाख रुपये द्यावे लागतील. अन्यथा हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करु.

या प्रकारामुळे, हा व्यक्ती पुरता घाबरुन गेला. एकीकडे आत्महत्या करावी की, पैसे देत रहावे हा सर्व संभ्रम निर्माण झाला.दरम्यान, हतबल झालेला हा व्यक्ती प्रचंड तणावाखाली आला होता. त्यामुळे, त्याने स्वत:ला बंदीस्त करून घेतले. मात्र, ही महिला त्यांना शोधत शोधत त्यांच्या घरी आली. हा राडा अधिक वाढत चालल्याचे लक्षात येताच त्यांनी संगमनेर गाठले. यावेळी, संबंधित महिलेने त्यांचा मोबाईल काढून घेत त्यांना शिवीगाळ दमदाटी करीत मारहाण केली.

तर दोन लाख रुपयांची मागणी करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यावेळी, या महिलेने धिटाई करुन त्यांच्याकडून दोन वेगवेगळ्या एटीएममधून 30 हजार रुपये काढून दिले. हे पैसे घेताना देखील व्हिडिओ काढण्यात आला. उर्वरित रक्कम दिल्यानंतर पुरावे डिलीट करू असे सांगण्यात आले. त्यामुळे, या हनी ट्रॅममध्ये बरेचसे पुरावे पीडित व्यक्तीकडे आहे. ही रक्कम घेतल्यानंतर संबंधित महिलेने त्या व्यक्तीस पुढील वायदा केला होता. त्यामुळे, तो प्रचंड तणावात होता.

पैशाची चटक लागलेल्या या महिलेने मंगळवार दि. 13 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास फोन केला. की, जर आज दुपारी मला पैसे दिले नाही तर मी व्हिडिओ व्हायरल करेल असे म्हणत ब्लॅकमेलींग केले. त्यानंतर पीडित व्यक्तीने याबाबत पोलीस अधिकारी घुगे यांना माहिती दिली. घुगे यांनी त्यांची एक टिम साध्या वेशात सुगाव फाटा येथे तैनात गेली आणि मंगळवारी दुपारी 3 वाजता या महिलेला तेथे बोलविण्यात आले.

दरम्यान ब्लॅकमेलींग करुन 10 हजार रुपयांची खंडणी वसुल केल्याप्रकरणी पंचांसह तिला ताब्यात घेण्यात आले. तर तिच्यासोबत असणारे रावसाहेब पंढरीनाथ सटाले (रा. संगमनेर) मुख्य सुत्रधार सपना सुभाष शिंदे (रा. संगमनेर) याच्यासह 6 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या हनीट्रॅप प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे,

पोलीस उपाधिक्षक राहुल मदने, सहा.पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांचेसह पीएसआय दत्तात्रय साबळे, बाबासाहेब बडे, विठ्ठल शरमाळे, आत्माराम पवार, आरती पानसरे, संगिता आहेर, संदिप भोसले, आनंद मैड आदी पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!