Monday, October 18, 2021

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाचे अपडेट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज: तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या SBI ने त्यांच्या 44 कोटी ग्राहकांसाठी हा अलर्ट पाठवला आहे. एसबीआयने ग्राहकांना फ्री गिफ्टच्या नावाखाली होणाऱ्या फ्रॉड संदर्भात सावध केले आहे. बँकेने एक ट्वीट करत त्यांच्या ग्राहकांना सूचना दिली आहे.

SBI ने ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, तुमच्याही इनबॉक्समध्ये अशाप्रकारे लिंक्स येत आहेत का? तर या फिशिंग लिंक करण्यापासून सावध व्हा, यावर क्लिक केल्याने तुमची वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती चोरी होऊ शकते. सावध राहा आणि कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा.

याआधीही वेळोवेळी एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना सावधानता बाळगण्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
-तुमची जन्मतारीख, डेबिट कार्ड क्रमांक, इंटरनेट बँकिंग युजर आयडी/पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही, ओटीपी इ. बाबी कुठेही शेअर करू नका
-एसबीआय, आरबीआय, सरकारी कार्यालय, पोलीस केवायसी इ. संबंधित अधिकारी म्हणून कॉल करणाऱ्यांपासून सावध राहा.

-एखादा कॉल किंवा इमेलद्वारे आलेल्या Unknown Source असणाऱ्या मोबाइल अॅप डाउनलोड करू नका-ज्याचा स्रोत माहित नाही अर्थात जे Unknown Source वरून आले आहेत, अशा मेलमधील Attachments वर क्लिक करू नका
-सोशल मीडिया किंव फोनवरुन मिळणाऱ्या शिवाय कोणत्याही फेक ऑफर्सपासून सावध राहा

-बँकेने वेळोवेळी याबाबतही सूचना दिल्या आहेत की तुमचं बँक खातं क्रमांक, पासवर्ड, एटीएम कार्डचा नंबर इ. चा फोटो काढून ठेवला असेल तर ते देखील धोकादायक आहे. ही माहिती लीक होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुमचं बँक खातं क्षणार्धात रिकामं होऊ शकतं.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!