Monday, October 25, 2021

जेऊर हैबती येथील बेकायदा गौण खनिज उत्खनन प्रकरणी कुकाणा येथे जेऊर ग्रामस्थांचा रस्तारोको

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

कुकाणा

नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील सरकारी जागेवरील गोैण खनिज उत्खनन प्रकरणी व तक्रारदारांनाच असभ्य भाषा वापरल्या प्रकरणी कुकाणा मंडलाधिकाऱ्यास निलंबित करावे या मागणीसाठी जेऊर हैबती ग्रामस्थांनी आज बुधवार दि.14 जुलै रोजी सकाळी कुकाण्यात रास्तारोको आंदोलन करुन नेवासा तहसिलदारांना निवेदन दिल्यानंतर मंडलाधिकाऱ्यासह संबंधीतांना नोटिस बजावुन कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी आंदोलनकर्त्यांना देण्यात आले.

तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी स्वतःउत्खनन झालेल्या जागेची पहाणी केली

जेऊरहैबती येथील सरकारी जागेवरील मुरुमाची चोरी झाल्याची तक्रार झाल्यानंतर कुकाणे मंडलाधिकारी यांनी पंचनामा केला मात्र पंचनामा सुरु असतांनाच उपस्थित तक्रारदारांनाच कानफाड फोडण्याची भाषा मंडलाधिकारी यांनी केली तसेच सरकारी जागेवर उत्खनन झालेले असतांनाही खोटा अहवाल वरिष्ठांना सादर केला अशी तक्रार ग्रामस्थाच्यावतीने ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बाळासाहेब फुलमाळी यांचेसह तक्रारकर्त्यांनी केली. मंडलाधिकारी यांचेवर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी आज बुधवारी सकाळी कुकाण्यात जेऊर चोैकातच रास्ता रोको आंदोलनाला प्रारंभ करताच तहसिलदार रुपेशकुमार सुराणा यांनी आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पुन्हा तहसिलदारांना निवेदन देत मंडलाधिकारी यांना निलंबित करा अशी मागणी केली तसेच मंडलाधिकाऱ्यांना निलंबित केलेच पाहिजे अशाही घोषणा दिल्या. आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारल्यानंतर कुकाणेचे मंडलाधिकारी व सर्व संबंधीतांवर कारवाई करण्याचे आश्वासन तहसिलदारांनी दिले. या गौण खनिज उत्खनन व चोरी प्रकरणी मंडलाधिय्राने दिलेला अहवाल चुकीचा असल्याच्या तक्रारी यावेळी तहसिलदारांकडे करण्यात आल्या. उत्खनन झालेली जागा सरकारी असुनही मंडलाधिकारी वरिष्ठांची दिशाभुल करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!