Friday, October 22, 2021

RBI चा दणका! Mastercard वर मोठी कारवाई तुमच्या कडे आहे कार्ड तर वाचा अत्यंत महत्वाची बातमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI निमयांचे पालन न करणाऱ्या वित्तीय संस्था आणि बँकांवर बेधडकपणे कारवाई करताना पाहायला मिळत आहे.

अनेक बँकांना नियमभंग किंवा नियमांचे योग्य पालन न केल्याप्रकरणी कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यात आता Mastercard वर मोठी कारवाई करत रिझर्व्ह बँकेने मास्टरकार्ड एशिया/पॅसिफिक पीटीईवर बंदी आणली आहे.पुरेशी मुदत देऊनही संस्थांना पेमेंट सिस्टम डेटा संग्रहित करण्याच्या सूचनांचे पालन न केल्याने

मास्टरकार्ड एशिया/पॅसिफिक पीटीईवर बंदी आणली असून, २२ जुलै २०२१ पासून त्याच्या कार्ड नेटवर्कवर नवीन स्थानिक ग्राहक (डेबिट, क्रेडिट किंवा प्रीपेड) जोडू शकणार नाहीत, असे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.या आदेशाचा मास्टरकार्डच्या विद्यमान ग्राहकांवर परिणाम होणार नाही. मास्टरकार्ड सर्व कार्ड जारी करणार्‍या बँकांना आणि बिगर बॅंकांना

या सूचनांचे अनुसरण करण्यास सल्ला देईल. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अ‍ॅक्टच्या कलम १७ अंतर्गत असलेल्या अधिकारांचा उपयोग करून ही कारवाई करण्यात आली आहे, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान, यापूर्वी बिगर-बँकिंग वित्त संस्थांना कर्ज देणे आणि मोठ्या कर्जांचा डाटा ठेवणे यासंबंधी घालून देण्यात आलेल्या नियमांचा भंग केल्यामुळे

१४ बँकांना रिझर्व्ह बँकेने मोठ्या रकमेचा दंड ठोठावला आहे. यामध्ये बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्रेडिट सुसी, इंडियन बँक, इंडसइंड बँक, कर्नाटक बँक, करुर वैश्य बँक, पंजाब ॲण्ड सिंध बँक, साऊथ इंडिया बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, जम्मू व काश्मीर बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!