Monday, October 25, 2021

महाराष्ट्रात नव्या करोनाबाधितांची संख्या वाढली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य सरकारांना करोनाच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, गरज पडल्यास पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा देखील सल्ला दिला आहे. राज्य सरकारने मात्र निर्बंधांमध्ये कोणताही बदल केला नसल्याचं जाहीर केलं आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातली आजची आकडेवारी काहीशी चिंतेत भर घालणारी ठरली आहे. कालच्या तुलनेत आज दिवसभरात राज्यात नोंद झालेल्या नव्या रुग्णांचा आकडा जवळपास १ हजार रुग्णांनी जास्त आहे. मंगळवारी राज्यात ७ हजार २४३ रुग्ण सापडले होते. आज हा आकडा ८ हजार ६०२ पर्यंत गेला आहे.

त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत करोनाची लागण झालेल्या व्यक्तींचा आकडा ६१ लाख ८१ हजार २४७ इतका झाला आहे.दरम्यान, एकीकडे नव्या करोनाबाधितांचा आकडा वाढला असताना दिवसभरात नोंद झालेल्या मृतांचा आकडा काहीसा खाली आला आहे. मंगळवारी राज्यात १९६ मृत्यूंची नोंद झाली होती. तो आकडा खाली येऊन आज दिवसभरात १७० मृत्यूंची नोंद झाली आहे.

एकूण मृतांचा आकडा १ लाख २६ हजार ३९० इतका झाला आहे. तर राज्याचा मृत्यूदर अजूनही २ टक्क्यांच्या वरच आहे. बुधवारच्या आकडेवारीनुसार राज्याचा मृत्यूदर २.०४ टक्के आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!