Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यातील या तीन तालुक्यात सर्वाधिक अशुध्द पाणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साथरोग नियंत्रणासाठी जलस्त्रोत तपासून दूषित पाण्याचा आढावा आरोग्य विभागाकडून घेतला जातो. जिल्ह्यात मागील महिन्यांत 1 हजार 731 पाणी नमुने तपासण्यात आले. त्यात 36 गावांतील 45 नमुने दूषित आढळले असून तेथे आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात आढळलेल्या 45 दूषित पाणी नमुन्यांपैकी सर्वाधिक 8 नमुने पारनेर, तर प्रत्येकी 7 दूषित नमुने पाथर्डी, राहुरी तालुक्यात आढळलेले आहेत. त्यानंतर नगर तालुक्यात 6 दूषित नमुने आढळले आहेत.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्याच्या तोंडावर नियमतिपणे पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते.

जून महिन्यांत जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतांतील 1 हजार 731 पाणी नमुने तपासण्यात आले. यातील 45 नमुने दूषित आढळले आहेत. या ठिकाणी पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत.

या गावांत दूषित पाणी
नारायणडोहो, कामरगाव, नागरदेवळे, देहरे, नांदगाव, सजलपूर, खिरविरे, देवठाण, संवत्सर, कोळपेवाडी, हतालखिंडी, वडुले, रायतळे, अस्तगाव, जवळा, सांगवीसूर्या, खांडगाव, खिरडे, आल्हनवाडी, पाडळी, चितळी, जवळे, जिरेवाडी, सूलतानपूर खु., आव्हाने बु., आखेगाव, शेकटे खु., विजापूर,अस्तगाव, शिलेगाव, तांदूळवाडी, अंमळनेर, चांदेगाव, जातक, राजापूर, वडगाव पान अशा 36 गावांत 45 पाणी नमुने दूषित आढळले आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!