Monday, October 18, 2021

लाचारीसाठी पक्ष एकत्र आले त्यांची एकी एवढ्या सहजासहजी तुटणार नाही:खा विखे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडी सरकार अस्थिर असल्याचे नाटक करत असून, सत्तेसाठी लचार असलेले हे सरकार आहे, अशी घाणाघाती टीका भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी नगर येथे पत्रकार परिषदेत केली.

विखे म्हणाले, राज्यात शेतकरी, कोरोनाची महामारी, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न न सोडविता अंतर्गत मतभेद असल्याचे दाखवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी ते तिन्ही पक्ष एकत्र आलेले नाहीत. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक त्यांना करायची नाही.

काहींना पैसे कमवायचे आहेत, ते पैसे कमविण्याच्या मागे लागलेले आहेत. काहीजण भांडत आहेत. सरकारमध्ये मतभेद आहेत. लाचारीसाठी हे पक्ष एकत्र आल्याने त्यांची एकी एवढ्या सहजासहजी तुटणार नाही, असाही टोला विखे यांनी लगावला.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना

विखे म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळात सहकाऱ्यांना संधी मिळालेली आहे. डॉ. प्रीतम मुंडे नाराज नाहीत. त्यांचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!