Saturday, October 23, 2021

कोरोना प्रसार:तज्ज्ञांनी सल्ला देत दिला गंभीर इशारा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. मात्र, लोकांना समोरचा धोकाच दिसत नाहीये.तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की जनतेच्या वागण्यात आलेल्या बदलांमध्ये सरकारवर त्यांचा असलेला विश्वास महत्त्वाचा असतो.

मात्र, आपलं दुर्भाग्य म्हणजे लोकांचा राजकीय पक्षांवर विश्वास कमी आहे. त्यांचं असंही म्हणणं आहे, की कोरोना प्रसाराची गंभीरता आणि लसीकरणाचा दर याबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्यानंही ही स्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर पर्यटनस्थळांवरील काही फोटो समोर येत आहेत, यात गाड्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत

आहेत. यामुळे चिंता आणखीच वाढली आहे. आपलं आयुष्य पुन्हा एकदा मार्गावर आणण्यासाठी लोकांनी कोरोनाच्या नियमांचंही सर्रास उल्लंघन केलं आहेवरिष्ठ महामारी विशेषतज्ञ ललितकांत म्हणाले, की नियमांचं पालन न करण्याचं कारण लोकांमध्ये आलेलं नैराश्य आणि जे होईल ते देवाच्या इच्छेनं होईल, यांचं मिश्रण आहे.

मानवी वर्तणूक आणि संबद्ध विज्ञान संस्थाचे संचालक निमेश देसाई म्हणतात की मास्क न घालणे आणि सामाजिक अंतर न पाळणे यासारख्या दुर्लक्षाचे कारण म्हणजे लोक समोरचा धोका पाहण्यास सक्षम नाहीत. ते म्हणाले, की भारतात सामाजिक बेजबाबदारीची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात दिसते. ते म्हणाले, की लोकांचं हे वागणं बदलणं अवघड आहे, मात्र अशक्य नाही.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एपिडेमिओलॉजी अँड कम्युनिकेशनल डिसिजेस विभागाचे माजी प्रमुख कांत म्हणाले की, लोक ज्या प्रकारे कोरोनाच्या नियमांचं पालन करतील त्यावर रुग्णसंख्येतील वाढ किंवा घट अवलंबून असेल. देसाई म्हणाले, “गेल्या दोन दशकांत विकसित

देशांना हे समजले आहे की प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य हे त्याच्या जीवनशैली आणि वागण्यावर अवलंबून असते. मात्र, ते आपल्या समाजात नाही.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!