Sunday, October 24, 2021

कोरोनामुळे नगर जिल्ह्यातील या तालुक्यातील 252 महिलांवर कोसळला दुखाचा डोंगर; मुलं झाली पोरकी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज: कोरोना महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक बालक निराधार झाले. राहाता तालुक्यातील जवळपास पन्नास गावात केलेल्या सर्वेत या आजारामुळे 255 कुटूंब पोरके झाले आहे. कोरोना हा केवळ आजार नव्हेतर अनेक कुटूंबाच्या समोर विविध प्रश्न उभे करणारा असा काळच ठरला आहे.

तरुण वयात अकाली वैधव्य आलेल्या महिलांच्या पुढे या पुढील जीवनात वाटचाल करावी तरी कशी? असा प्रश्न उभा ठाकला आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघात एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या वतीने 318 अंगणवाडी सेविकाची मदत घेऊन सर्वे करण्यात आला आहे. यात एकट्या राहाता तालुक्यात 255 महिलांना कोरोनामुळे आपल्या पतींना गमवावे लागले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पहिल्यांदा राहाता तालुक्यात अशाप्रकारचे सर्वे करणारा तालुका पहिला तालुका ठरला. ज्या पद्धतीने किती बालके निराधार झाली, याची माहिती घेतली जात असताना कोणत्या वयोगटातील कोणत्या महिला यांना अकाली वैधव्य आले आहे. याकडे देखील लक्ष देण्यात आले होते. 18 ते 30 वयोगटातील 17 महिला असून, 31 ते 40 वयोगटातील 48 महिला,

41 ते 50 वयोगटातील 43 तर 51 ते 70 या वयोगटातील 114 महिलाचा व 70 ते 90 यातील 32 महिलांचा जोडीदार या आजाराने हिरावून नेले आहे. त्या अनुषंगाने राहाता तहसील कार्यालयाने 60 महिलांना संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी निराधार योजना यांचा लाभ दिला. 29 महिलांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी 20 हजाराची मदत दिली जाईल,

अशी माहिती गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी ‘ बोलतांना दिली आहे. कोरोना संकटात महिला असो की पुरुष शासनाच्या माध्यमातून ज्या योजना आहेत, त्याचा लाभ देण्यासाठी तहसील कार्यालयाने प्राधान्यक्रम दिले आहे. ज्यांना या आजाराचा फटका बसला आहे, त्यांनी योग्य त्या कागदपत्रासह राहाता तहसीलकडे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!