Monday, October 18, 2021

अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी जप्त मालमत्ता लिलावाची नोटीस

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :-गौणखनिजाचे अवैध उत्खननाबाबत तसंबंधितांकडून प्रलंबित असलेल्या दंडात्मक रकमेची वसुली करण्यासाठी जप्त स्थावर मालमत्ता लिलावाची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी ( पाथर्डी भाग पाथर्डी) देवदत्त केकाण यांनी दिली आहे.

कपिल सतिषचंद्र अग्रवाल रा. पाथर्डी. ता. पाथर्डी, जि. अहमदनगर यांनी मौजे पाथर्डी येथील गट नं. 342 मध्ये 747 ब्रास इतक्या मुरुम या गौणखनिजाचे अवैध उत्खननाबाबत त्यांचेकडेस प्रलंबित असलेल्या दंडात्मक रक्कम रुपये बावीस लाख एक्केचाळीस हजार रकमेच्या वसूलीसाठी मौजे पाथर्डी गट नं. 7/1/5 क्षेत्र 1.39.40

आर या स्थावर मालमत्ता जप्त करुनही प्रलंबित दंडात्मक रक्कमेची वसूली झालेली नसल्याने प्रस्तुत प्रकरणी जिल्हा खनिकर्म अधिकारी, अहमदनगर यांचेकडील दिनांक 28 जुन 2021 अन्वये कपिल सतिषचंद्र अग्रवाल रा. पाथर्डी यांचे जप्त स्थावर मालमत्तेचा लिलाव करणेबाबत उपविभागीय अधिकारी, पाथर्डी यांना कळवले होते. त्या अनुषंगाने संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे.

विक्रीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी, पुर्वोक्त रक्कम देण्यात आली नाही तर उक्त मालमत्ता नवीन प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, पाथर्डी येथे दिनांक 16 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता किंवा 11 वाजण्याच्या सुमारास जाहिर लिलावाव्दारे विकण्यात येईल. ही विक्री उक्त मालमत्तेमधील उक्त कसुरदाराचा अधिकार, हक्क व हितसंबंध यांनाच केवळ लागु होतो. असे कळविण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!