Monday, October 25, 2021

हे काय आता :अण्णा हजारेंनीच केली स्वत: स्थापन केलेल्या बँकेतील गैरव्यवहाराची तक्रार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर सैनिक सहकारी बँकेची स्थापना अण्णा हजारे यांच्या पुढाकारातून झाली. १९९६ मध्ये बँकेला परवाना मिळाला. बँकेचे संस्थापक अध्यक्ष हजारे होते. त्यांच्या नावामुळे काही काळातच बँकेत मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्या. पाच वर्षांनंतर हजारे यांनी बँकेच पद सोडले आणि इतर माजी सैनिकांकडे बँकेची जबाबदारी सोपविली.

त्यानंतर काही काळातच या बँकेबद्दल तक्रारी सुरू झाल्या. बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे गेली पाच वर्षे विनायक गोस्वामी, बाळासाहेब नरसाळे, कॅप्टन विठ्ठल वराळ, मारुती पोटघन, संपत शिरसाठ व विद्यमान संचालक सुदाम कोथिंबीरे यांनी सहकार विभागाकडे देऊन तपासणी व्हावी, अशी मागणीही केली होती.

मात्र सहकार विभाग ठोस निर्णय घेत नव्हता. शेवटी या तक्रारदारानीं त्या फाईल्स हजारे यांच्याकडे दिल्या. हजारे यांनी त्याचा अभ्यास करून खात्री केली. खात्री झाल्यावर सहकार आयुक्तांना पत्र पाठवून सैनिक बँकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली. त्याची दखल घेत या तक्रार अर्जाची स्वतंत्र चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश

सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी विभागीय सहनिबंधक आर.सी. शाह यांना दिले. शाह यांच्यासह जवळपास दहा अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक गेल्या काही दिवसांपासून सैनिक बँकेत चौकशी करत आहे. लवकरच ते सहकार आयुक्तांना आपला अहवाल सादर करणार आहेत.सहकार विभाग आणि भारतीय रिझर्व बँकेकडे पाठपुरावा केल्यानंतर १९९६ मध्ये या बँकेला परवाना मिळाला.

या बँकेचा संस्थापक अध्यक्ष आपण असल्यामुळे बँकेला ठेवी जमा झाल्या. परंतु मला कोणतीही निवडणूक लढवायची नसल्याने पाच वर्षांनंतर अध्यक्षपदावरून दूर झालो. बँकेच्या अध्यक्ष, संचालकपदाची धुरा इतर माजी सैनिकांकडे सोपवली. बँकेला उज्वल भविष्य लाभावे, ही आपली संकल्पना होती मात्र, अलीकडच्या काळात या बँकेत भ्रष्टाचाराचा

शिरकाव झाल्याचे पुरावे आपणाकडे आल्याने दुःख झाले आहे. ते आपल्याकडे देत असून त्याची योग्य चौकशी व्हावी, अशी मागणी हजारे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!