Monday, October 25, 2021

नेवासा काँग्रेसचे इंधन दरवाढी विरोधात पंपावर मोर्चासह सह्यांचे अभियान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र :-देशात दिवसेंदिवस वाढणारी महागाई, पेट्रोल, डीजल, गॅस,गोडेतेल, इंधनात होणारी गगनभेदी दरवाढ याविरोधात नेवासा तालुका कॉंग्रेस कडून नेवासा फाटा येथील भोसले पेट्रोल पंपावर मोर्चा काढण्यात आला तसेच एक लाख सह्यांचे अभियानास सुरुवात करण्यात आली.

यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांनी केंद्रातील मोदी सरकार तसेच इंधन दरवाढी विरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.नेवासा तालुका काँग्रेस , शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआई, महिला काँग्रेस, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.

यावेळी आंदोलका समोर बोलताना नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी इंधन दरवाढीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना प्रचंड प्रमाणात कर लावून देशात पेट्रोल, डीजल, गॅस,यामध्ये प्रचंड प्रमाणात भाववाढ करून मोदी सरकार जनतेची लूट करत असल्याचा आरोप केला.

जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे यांनी मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाली आहे याकाळात सतत खोटी आश्वासने देवुन जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला, शहराध्यक्ष रंजन जाधव यांनी मोदी सरकारने इंधनाचे दर त्वरित कमी करावे जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असा इशारा दिला.तसेच तालुक्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर जाऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करून सह्यांचे अभियान राबविण्यात येईल असे स्पष्ट केले.

या आंदोलनात जिल्ह्या काँग्रेसचे सेक्रेटरी सुदामराव कदम, नेवासा काँग्रेसचे विजय गायकवाड, रमेश जाधव, साहेबराव पवार, गटप्रमुख संतोषभाऊ साळवे, प्रसिध्दी प्रमुख सचिन बोर्डे, जितेंद्र पतंगे, संदीप मोटे, अक्षय फुगे,अभिषेक गायकवाड, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष मुसाभाई बागवान, राजुभाई पिंजारी, अय्याज शेख, हानिफभाई बागवान, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश धनवटे, एनएसयुआईचे अध्यक्ष सौरभ कसावणे, अतिष धनवटे महिला काँग्रेसच्या शोभाताई पातारे, सोनाली इथापे, मनीषा उमाप, आदींसह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

[वाढती बेरोजगारी, महागाई, इंधन दरवाढ, शेतकरी व कामगार विरोधी केलेले काळे कायदे, बुडालेली देशाचीअर्थव्यवस्था याला जबाबदार मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस जनतेच्या पाठिशी उभी राहणार व आक्रमक भूमिका घेऊन सरकारला जाब विचारणार. :- संभाजी माळवदे अध्यक्ष , नेवासा काँग्रेस कमिटीी]

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!