Friday, October 22, 2021

दोन भारतीय क्रिकेटरला कोरोनाची लागण तर तीनजण विलगीकरण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघावर कोरोनाव्हायरसने हल्लाबोल केला आहे. आधी संघातील महत्त्वाचा खेळाडू असणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कोरोनाबाधित आढळला असून त्यापाठोपाठ आणखी एका सदस्याला कोरोनाची बाधा झाली आहे. हा सदस्य संघातील खेळाडू नसून सपोर्ट स्टाफ मेम्बर आहे.

संबधित सदस्याला आयसोलेट करण्यात आले असून तो संघासोबत डरहमला जाणार नाही. दरम्यान आणखी 3 कोचिंग असिस्टंटनाही कोरोनाची लक्षण जाणवू लागल्याने त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतसह आणखी चार सदस्य इतर संघासोबत डरहमला जाऊ शकणार नाही.

यामध्ये एका सपोर्ट स्टाफसह तीन कोचिंग असिस्टंच आहेत. या चौघांची नावं अजून समोर आलेली नसून हे तिघेही इतर संघातील खेळाडूप्रमाणेच WTC Final नंतर मागील 20 दिवसांपासून इंग्लंडमध्ये सुट्टी घालवत आहेत.बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऋषभ पंत मागील 8 दिवसांपासून विलगीकरणात असून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कोरोनाची

लक्षणं दिसत नाहीत. मात्र तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून तो आणखी काळ विश्रांती करणार असून भारतीय संघ डरहमला खेळायला जाणाऱ्या सराव सामन्यासाठीही पंत संघासोबत नसणार आहे. पंतची प्रकृती ठिक होण्यासाठी किती दिवस लागतील, याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. दरम्यान मागील काही दिवसांपासून युकेमध्ये आढळणारा डेल्टा वेरियंटच पंतमध्ये आढळून आल्याची माहिती समोर येत आहे.

पंतला युरो चषकाचा सामना पडला महाग

बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यामनी युकेमधील कोरोना परिस्थितीमुळे खेळाडूंना इमेलद्वारे काही सूचना दिल्या होत्या. ज्यात त्यांनी खेळाडू आणि टीमच्या इतर सदस्यांना युरो चषक 2020 विम्बल्डनसारख्या भव्य स्पर्धांना हजेरी न लावण्याबाबत सतर्क केले होते. मात्र इतर खेळाडूंप्रमाणेच पंतने देखील इंग्लंड विरुद्ध जर्मनी या

सामन्याला लंडनच्या वेम्बली मैदानात हजेरी लावली होती. त्यामुळे त्याचठिकाणी त्याला कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!