Monday, October 18, 2021

धक्कादायक! Corona होऊनही RT-PCR test येतायत negative

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज: रुग्णांना कोरोनाची सर्व लक्षणं असूनही आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह येण्याचे प्रकार समोर आले आहेत. कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीचे रिपोर्ट हे विश्वासार्ह मानले जातात.

मात्र आतापर्यत कोरोनाची गंभीर लक्षणं असलेल्या 8 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा प्रकार बंगळुरूमध्ये घडला आहे.बंगळुरूमधील 8 जणांना कोरोनाची सर्व लक्षणं होती. त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. चाचणीचे रिपोर्ट येण्यापूर्वीच त्यांची लक्षणं बळावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.

त्यांच्या सिटी स्कॅनमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन झाल्याचं दिसून आलं. मात्र प्रत्यक्षात आरटीपीसीआर चाचणीचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आले. या आठपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र एवढ्या गंभीर स्वरुपाचं इन्फेक्शन होऊनदेखील आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह कशी आली, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

अनेकदा टेस्ट करण्यासाठी ती किट वापरली जातात, त्यांचा दर्जा खराब असेल, तर चाचणीच्या निष्कर्षावर त्याचा परिणाम होत असल्याचं सांथरोग तज्ज्ञ डॉ. रघु यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं आहे. ज्या नागरिकांना लक्षणे दिसत असूनही टेस्ट निगेटिव्ह येईल, त्यांनी सिटी स्कॅन करून घेणं, गरजेचं असल्याचं ते म्हणाले.

आतापर्यंतच्या अनुभवानुसार एकूण चाचण्यांपैकी साधारण 10 ते 15 टक्के चाचण्यांचे अहवाल चुकत असल्याचं दिसून आलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणं एखाद्या व्यक्तीचे नमुने कधी गोळा केले जातात आणि ते कधी तपासले जातात, यावरही अशा चाचण्यांचे निष्कर्ष ठरत असल्याचं ते म्हणाले.

जर लागण झाल्यावर नऊ दिवसांची नमुने घेतले, तर ते निगेटिव्ह येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणं जर नमुने घेतल्यानंतर बराच काळ ते तपासले गेले नाहीत, तरीही रिपोर्ट निगेटिव्ह येण्याची शक्यता असते, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!