Saturday, October 23, 2021

मोठी बातमी:कोरोनाची तिसरी लाट आलीच; WHO ने केलं अलर्ट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:ज्याची भीती वाटत होती, ते प्रत्यक्षात घडलं आहे. अखेर कोरोनाची तिसरी लाट आलीच. जागतिक आरोग्य संघटनेनंच कोरोनाची तिसरी लाट आल्याची घोषणा केली आहे.डब्ल्यूएचओने  जगात तिसऱ्या कोरोना लाटेची सुरुवात झाल्याचं सांगितलं आहे.

डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रेयेसस यांनी आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यात आलो आहोत, असं सांगत सर्व देशांना अलर्ट केलं आहे. बुधवारी त्यांनी ही माहिती दिली.डॉ. टेड्रोस गेब्रेयेसस यांनी सांगितलं, कोरोनाव्हायरस सातत्याने स्वतःमध्ये बदल करत आहे. सोबतच तो अधिक संसर्गजन्यही होतो आहे.

डेल्टा व्हेरिएंट आता  111 पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचला आहे. लवकरच हा जगभर पसरू शकतो. अल्फा व्हेरिएंट 178 देशांत आहे. तर बिटा आणि गामा व्हेरिएंट अनुक्रमे  123 आणि 75 देशांमध्ये दिसून आला आहे.भारतात पहिल्या दोन लाटांचं स्वरूप पाहता तिसरी लाट येणं अटळ असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

दुसऱी लाट ओसरल्यानंतर नागरिकांमध्ये ज्या प्रकारची बेफिकिरी दिसत आहे, ती चिंताजनक असून तिसऱ्या लाटेचं गांभिर्य वाढवणारी असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशननं म्हटलं आहे.तर पीटीआयच्या मते, UBS सिक्युरिटज इंडियाच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ तज्ज्ञ तन्वी गुप्ता जैन यांच्या मते, भारतात तीन मुख्य कारणांमुळेच तिसऱ्या लाटेचा मोठा धोका आहे.

जैन म्हणाल्या, बहुतेक राज्यांमध्ये नियम शिथील केले जात आहेत. आर्थिक व्यवहार खुले केले जात आहेत आणि लसीकरणाचा वेगही मंदावला आहे. यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका अधिक वाढला आहे.

 

 

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!