Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यातील या ठिकाणी विवाहित महिला सरपण आणण्यासाठी गेली असता घडला विचित्र प्रकार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर येथे काल बुधवारी सायंकाळी विवाहित महिला चुलीसाठी सरपण आणण्यासाठी गेली असता शेतात तिला अडवून तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी संबंधित महिलेने घारगाव

पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोखरी बाळेश्वर येथील विवाहित महिला सरपण आणण्यासाठी घराजवळील शेतात गेली असता त्याठिकाणी राजेंद्र जिजाबा फटांगरे, संकेत विजय फटांगरे, किरण संजय फटांगरे यांनी

सदर महिलेला अडवून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी सदर महिलेने आरडाओरडा केला असता महिलेचा पती, सासरे, सासू घटनास्थळी येऊन त्यांनी आरोपींना समजून सांगताना आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की केली. याप्रकरणी वरील तिघांवर घारगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गांजवे करीत आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!