Sunday, October 24, 2021

आ. लहू कानडे आयत्या पिठावर रेघा मारतात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हे वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटन करत आहे आणि हे रस्ते आपण स्वतः कसे मंजूर करून आणले याचा खोटा गवगवा करून करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहे, असा आरोप माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केला आहे.

माझ्या कार्यकाळात सन २०१८-१९ मध्ये साडेनऊ कोटींचे रस्ते मी मंजूर करून आणले होते. हे सर्व रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेमार्फत करून आणले आहे. कानडे तेच खोटे उद्घाटन करत आहे. आम्ही विरोधक असल्यामुळे आमच्या कामाचा गवगवा होऊ नये म्हणून आमचा नामोल्लेख टाळला इथपर्यंत आम्ही समजू शकतो. परंतु, ज्या मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून हे काम स्वतः करत आहे

, त्यांचं नाव फोटो टाकायला आमदार कानडे यांना कमीपणा वाटतो का? ज्यांनी मदत केली त्यांचे नाव घ्यायला जर तुम्हाला कमीपणा वाटत असेल तर तुम्ही लोकप्रतिनिधी कसे होऊ शकता? असा सवाल प्रसिद्धपत्रकाद्वारे करण्यात आला आहे.श्रीरामपूर तालुक्यातील अनेक मंदिरांसमोर पेविंग ब्लॉक बसवण्यात येत आहे, तो निधी माझ्या कारकिर्दीत मंजूर करून आणलेला आहे.

त्याचेही उद्घाटन करताना त्यांना मित्र पक्षांचे नाव घ्यायला कमीपणा वाटतो. त्यामुळे जनतेने हे जे काम होत आहे याची दिशाभूल करून घेऊ नये. हे आम्ही आमच्या मागील काळात कामे मंजूर करून आणली आहे आणि सध्याचे आमदार हे आयत्या पिठावर फक्त रेघा मारत आहे, असा टीकेचा बाण माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी विद्यमान आमदार लहू कानडे वर सोडला आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!