Wednesday, October 27, 2021

कोरोना आता आणखीच घातक होणार ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज: जागतिक आरोग्य संघटनेच्या आपात्कालीन समितानं गुरुवारी ज्याप्रकारे इशारा दिला आहे, त्यानुसार कोरोना महमारीचं  आतापर्यंतचं रूप हे केवळ ट्रेलर आहे. पुढे आणखीच भयंकर चित्र पाहायला मिळणार आहे. आरोग्य संघटनेनं म्हटलं, की येत्या काळात जगभरात कोरोनाचे नवे व्हेरिएंट  पसरण्याची शक्यता आहे.

यामुळे महामारीसोबतचा लढा आणखीच अवघड होऊ शकतो.समितीनं म्हटलं, की महामारी अजून संपलेली नाही. या गोष्टीची अधिक शक्यता आहे, की जागतिक स्तरावर आणखी भयंकर व्हेरियंट पसरू शकतात. यांच्यावर नियंत्रण मिळवणंही आणखीच अवघड असेल. 2019 मध्ये चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोनानं आतापर्यंत जगभरात 40 लाखाहून अधिकांचे बळी घेतले आहेत.

तर, आतापर्यंत 18 कोटी 93 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे.आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी चीनला पुन्हा एकदा म्हटलं आहे, की महामारीच्या प्रसाराबाबत माहिती मिळवण्यासाठी सहकार्य करा आणि डेटा उपलब्ध करून द्या. ट्रेडोस अदनोम यांनी पत्रकारांसोबत बोलताना म्हटलं, की कोरोनो कुठून आला याच्या तपासासाठी आरोग्य संघटनेनं एक फ्रेमवर्क तयार केलं आहे.

ते म्हणाले, की आशा आहे की यावेळी चांगलं सहकार्य मिळेल. त्यांनी असंही सांगितलं, की सुरुवातीच्या तपासात अनेक अडचणी आल्या होत्या.कोरोना विषाणू सातत्यानं आपलं रूप बदलत आहे. याच्या डेल्टा व्हेरिएंटनं सध्या बऱ्याच देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. भारतात दुसऱ्या लाटेसाठी

कारणीभूत मानला जाणारा हा व्हेरिएंट कोरोनाच्या मूळ स्वरुप म्हणजेच अल्फा व्हेरिएंटपेक्षा जास्त घातक आहे

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!