Monday, October 25, 2021

आरेरे! मित्राकडून डॉक्टर महिलेवर बलात्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:एका महिला डॉक्टरने आपल्या मित्राविरोधात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल केला आहे. मित्राने आधी तिच्यासोबत अश्लील कृत्य केले, त्यानंतर याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि पैसेही काढून घेतले, असा या डॉक्टर महिलेचा आरोप आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना भोपाळच्या पिपलानी पोलीस ठाण्याचे चैनसिंह रघुवंशी यांनी सांगितले की, बुधवारी 24 वर्षीय एमबीबीएस डॉक्टर महिलाने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या मित्राने एमपी नगर आणि पिपलानी भागातील हॉटेलमध्ये तिच्यासोबत बलात्कार केला.

यावेळी त्याने व्हिडीओ सुद्धा तयार केला. यानंतर हा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने जवळपास दीड लाख रुपयेही या महिलेकडून घेतले. यानंतरही आरोपीने महिलेचा अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला, त्यानंतर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची दोन वर्षांपूर्वी आरोपी युवकासोबत मैत्री झाली होती. दोघेही मैत्रीनंतर बरेच दिवस एकमेकांशी बोलत होते. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये आरोपीने महिलेला एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी बोलावले आणि त्याठिकाणी तिच्यासोबत बलात्कार केला आणि व्हिडीओ तयार केला.

यानंतर आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिच्याकडून जवळपास दीड लाख रुपये घेतले.पीडित महिलेने केलेल्या आरोपाच्या आधारे आरोपीच्या बँक अकाऊंट डिटेल्स तपासले जात आहेत. टीआयच्या म्हणण्यानुसार आरोपी युवक इंदूरचा रहिवासी आहे.

सध्या आरोपीविरोधात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीतून पैसे काढल्याची खात्री झाल्यानंतर त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल करता येऊ शकतात.

 

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!