Wednesday, October 27, 2021

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी एका शिवसैनिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी कट रचून नियोजन पद्धतीनं हत्या घडवून आणली आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

बुधवारी रात्री उशीरा ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.सतीश नारायण क्षीरसागर असं हत्या झालेल्या शिवसैनिकाचं नाव असून ते मोहळ शहरातील सिद्धार्थनगर येथील रहिवासी आहेत. तर विजय सरवदे हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मृत सतीश क्षीरसागर आणि जखमी विजय सरवदे आपल्या दुचाकीवरून जात होते. दरम्यान मोहोळ शहरातील गुरुनाथ मंगल कार्यालयाजवळून जात असताना. त्यांना एका टॅम्पोनं जोरदार टक्कर मारली. या घटनेत सतीश यांचा जागीच मृत्यू झाला. तर विजय सरवदे हे गंभीर जखमी झाले.

याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष जनार्दन सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा अनिल फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे व भय्या असवले या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर टॅम्पोचालक भय्या असवले या तरुणास अटक करण्यात आली आहे. पोलीस सध्या या घटनेचा पुढील तपास करत असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, चार महिन्यांपूर्वी मोहोळमध्ये नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. दरम्यान शहरातील प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये काही बोगस मतदार नोंदणी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी मृत सतीश क्षीरसागर आणि जखमी विजय सरवदे यांनी प्रांताधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली होती.

संबंधित तक्रारीची दखल घेत प्रांताधिकाऱ्यांनी बोगस नावं कमी केली होती. याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात रोष होत्या. यातूनचं घटनेच्या चार महिन्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सूड उगवल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!