Monday, October 25, 2021

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.हे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.आज दुपारी ३:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भूजल क्षेत्रात देशपातळीवरच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील गेली ५० वर्षे नावाजलेल्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला आज ५० वर्षे पूर्ण होत आहे. दिनांक १६ जुलै १९७१ रोजी राज्यामध्ये भूजलाशी निगडीत कामे करण्याकरीता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची स्थापना करण्यात आली. तेंव्हापासून ते आजतागायत यंत्रणेने महाराष्ट्र राज्याच्या भूजल विकास व व्यवस्थापनामध्ये बहु मूल्य योगदान दिलेले आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आजपर्यंत कृषी विभाग, उद्योग व कामगार विभाग, ग्रामविकास विभाग, जलसंधारण विभाग आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांशी संलग्नित राहिली असून यंत्रणेतील भूवैज्ञानिक, अभियंते, भूभौतिकतज्ञ व रसायनी इतर तंत्रज्ञ यांनी गेल्या ५० वर्षामध्ये राज्यातील गोरगरीब व दुर्गम भागातील जनतेला पाण्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात जलसंधारणाच्या पाझर तलावासारख्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये शेती व सिंचन या क्षेत्रात आणि भूजल पुनर्भरण व भूजल व्यवस्थापन या क्षेत्रात मोठा वाटा उचलेला आहे.

यंत्रणेचे मुख्यालय पुण्यामध्ये असून प्रत्येक महसूली विभागात विभागीय कार्यालये व जिल्हास्तरावर जिल्हा भूवैज्ञानिक कार्यालये कार्यरत आहेत. १९७२ च्या दुष्काळानंतर राज्यामध्ये निर्माण झालेल्या पाण्याच्या समस्यांच्या अनुषंगाने यंत्रणेने राज्यातील गावांचे मूलभूत भूजल शास्त्रीय सर्वेक्षण करुन भूजलायोग्य क्षेत्राची निवड केलेली आहे. राज्यामधील नदी खोरे, उपखोरे यांचे विभाजन करुन राज्यात पहिल्यांदा पाणलोट क्षेत्रांचे रेखांकन केले व पुढील काळात झालेल्या पाणलोट विकास कार्यक्रमाची पायाभरणी केली. एवढेच नव्हेतर निर्धारित केलेल्या प्रत्येक पाणलोटामागे त्या पाणलोट क्षेत्रांतील भूजलाची स्थिती जाणून घेण्याकरीता निरिक्षण विहिरींची व्यवस्था उभारली, त्यामुळे आज राज्याकडे भूजल पातळी संबंधी गेल्या पाच दशकाची माहिती उपलब्ध आहे. या माहिती आधारेच पुढे यंत्रणेने केंद्रीय भूमीजल मंडळाच्या मार्गदर्शनानुसार राज्याचे भूजल अंदाज अहवाल तयार करण्यास सुरुवात केली व ती आज अत्याधुनिक पध्दतीने करण्यात येत आहे अशाप्रकारे अव्याहतपणे भूजलाच्या क्षेत्रात काम करणारी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ही देशातील एकमेव यंत्रणा आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने राज्याचे सखोल भूजल सर्वेक्षण करुन ग्रामीण भागांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सुविधेकरीता हातपंप, विद्युतपंप, सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी पंप यासारख्या अनेक उपाययोजना करुन ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. एवढेच नव्हे तर, निर्माण झालेले पिण्याच्या पाण्याचे उद्भव अधिकाधिक शाश्वत राहणेकरीता जलसंधारण व भूजल पुनर्भरण या तंत्राचा वापर करुन पारंपारिक व अपारंपारिक पध्दतीने स्त्रोत बळकटीकरणाच्या उपाययोजना राबविलेल्या आहेत. त्याचा फायदा राज्यातल्या अनेक गावांना झालेला आहे.

राज्यातील जनतेला शुध्द जल पिण्यास मिळावे याकरीता यंत्रणेमार्फत १७८ पाणी तपासणी प्रयोगशाळांची निर्मिती केलेली असून त्याव्दारे गावांतील पेयजलाच्या स्त्रोतांची रासयणिक व जैविक तपासणी केली जाते. तसेच राज्य पातळीवरील प्रयोगशाळेच्या निर्मितीचे काम सुध्दा सुरु झालेले आहे. राज्यातील पंधरा प्रयोगशाळांना पातळीवरील एनएबीएल हे अधिस्विकृती प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे.

राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये सुध्दा यंत्रणेने जलस्वराज्य, महाराष्ट्र जलसुधार क्षेत्र प्रकल्प, जलविज्ञान प्रकल्प यासारखे पथदर्शी प्रकल्प राज्यांमध्ये राबवून लोकसहभागातून भूजल व्यवव्थापनाची मुहूर्तमेढ रोवली आहे. यासोबतीला यंत्रणेने राज्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या संरक्षणार्थ महाराष्ट्र भूजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम १९९३ व आता महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ यासारख्या अधिनियमाव्दारे भूजल व्यवस्थापनास कायदयाचे अधिष्ठाण दिलेले आहे.

यंत्रणेने राबविलेल्या लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन अश्या पथदर्शी प्रकल्पांच्या शिकवणीची दखल घेऊन केंद्र शासनाने अटल भूजल योजना देशातील सात राज्यांमध्ये राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सदर योजना राज्यातील तेरा जिल्हयांमध्ये राबविण्यात येत असून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ही कार्यान्वित यंत्रणा म्हणून काम करीत आहे.

भूजलाचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याकरीता यंत्रणेने सुवर्ण महोत्सवी वर्षी भूजल साक्षरता अभियान राबविलेले आहे. याकरीता ऑनलाईन पध्दतीने गेल्या काही महिन्यापासून “आवो भूजल जाने” ही वेबीनारची शृंखला चालविलेली आहे व यामध्ये आतापर्यंत एकूण २७ वेबीनार पूर्ण झालेले आहेत. या अभियानामध्ये प्रामुख्याने नेहरु युवा केंद्र, पाणी फाऊंडेशन, जलसाक्षरता केंद्र, व्ही.एस.टी. एफ, राष्ट्रीय सेवा योजना, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य व राज्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविलेला आहे, त्यामुळे राज्यात भूजल साक्षरता अभियानांची चळवळ सुरु झालेली आहे. आजपर्यंत एकूण ६५३ वेबीनार झालेले असून त्याव्दारे ५६००० हून अधिक लोकांना प्रशिक्षीत करण्यात आले आहे.जनतेला भूजलाची पुनर्भरणाची, जलव्यवस्थापनाची अधिकाधिक माहिती चित्रस्वरुपात मिळणेकरीता भूजल साक्षरता रथ यात्रेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील सर्व कार्यालयाव्दारे महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले होते, तसेच राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत राज्यस्तरावर लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन सोहळा आज दिनांक १६ जुलै २०२१ रोजी दुपारी ३:३० वाजता मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री, मंत्री, महसूलमंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत असून सदर सोहळयाचे जाहिर प्रक्षेपण ऑनलाईन पध्दतीने राज्यभरात होणार आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!