Wednesday, October 27, 2021

पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी नोंदवला हा जबाब

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे, राज्यात एकच खळबळ उडाली होती. तिच्या आत्महत्येला शिवसेनेचे मंत्री संजय राठोड हेच जबाबदार असल्याचे बोलले गेले. या आरोपामुळे राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता.

त्यानंतर, आता पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे जबाब नोंदविला असल्याची माहिती समोर आली आहे.आमची कोणा विरोधात काही तक्रार नसल्याचा जबाब पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पोलिसांकडे नोंदविला आहे. अशी माहिती झोन पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.

तर, यामुळे संजय राठोड यांना दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.या जबाबाबद्दल झोन पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आमची कोणत्याही व्यक्ती विरोधात तक्रार नसल्याचे पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. तसेच, या प्रकरणाचा आमचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

आता या जबाबामुळे शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना या प्रकरणातून एकाप्रकारे क्लिन चिट मिळाल्याचेच स्पष्ट होत असून, येत्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात भारतीय जनता पक्षाने सुद्धा संजय राठोड यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप झाल्याने संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.माजी वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत दिले होते.

त्यानंतर आता संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे संजय राठोड हे राज्य मंत्रिमंडळात कमबॅक करणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!