Monday, October 25, 2021

 जॉन्सन अँड जॉन्सनच्या काही उत्पादनांमध्ये आढळून आले बेन्झीन रसायन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: जॉन्सन अँड जॉन्सन  या अमेरिकी कंपनीच्या काही उत्पादनांमध्ये बेन्झीन हे रसायन असल्याचं आढळून आलं आहे. या रसायनामुळे माणसाला कर्करोग अर्थात कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यामुळे आपली सनस्क्रीन उत्पादनं बाजारपेठेतून मागे घेण्याचा निर्णय कंपनीने बुधवारी (14 जुलै) घेतला आहे.

या सनस्क्रीन उत्पादनांचं अंतर्गत परीक्षण करण्यात आलं, त्यावेळी त्यात कमी प्रमाणात बेन्झीन हे रसायन असल्याचा शोध लागला, असं एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, आश्चर्यकारक बाब अशी की कंपनी आपल्या कोणत्याच उत्पादनांच्या निर्मितीवेळी त्यात बेन्झीन घालत नाही, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

अवीनो प्रोटेक्ट + रिफ्रेश एअरोसोल सनस्क्रीन आणि चार न्यूट्रोजेना सनस्क्रीन व्हर्जन – बीच डिफेन्स एअरोसोल सनस्क्रीन कूलड्राय सपोर्ट एअरोसोल सनस्क्रीन , इनव्हिजिबल डेली डिफेन्स एअरोसोल सनस्क्रीन आणि अल्ट्राशीअर एअरोसोल सनस्क्रीन  ही उत्पादनं कंपनी मागे घेणार आहे.

ही उत्पादनं अमेरिकेतल्या किरकोळ विक्रेत्यांकडे पाठवण्यात आली होती, असं वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे. कंपनीच्या, तसंच एका स्वतंत्र प्रयोगशाळेत या उत्पादनांचं परीक्षण करण्यात आलं होतं. तेव्हा त्यात बेन्झीन असल्याचं निष्पन्न झाल्याचं कंपनीने म्हटलं आहे.सनस्क्रीन वापरू नये, असं आवाहन ग्राहकांना करण्यात आलं आहे.

तसंच, ज्यांनी ही उत्पादनं खरेदी केली आहेत, त्यांचे पैसे त्यांना परत केले जाणार आहेत. संबंधित व्यक्तींनी कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राला फोन करून आपले पैसे परत घ्यावेत, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.

‘आम्हाला या प्रकाराची कल्पना आल्यानंतर आम्ही तातडीने आमच्या उत्पादनांसाठी वापरला जाणारा कच्चा माल आणि उत्पादन प्रक्रियेची तपासणी सुरू केली. अंतर्गत परीक्षणही करण्यात आलं,’ असं जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!