Friday, October 22, 2021

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या! आज आणि उद्या बंद राहणार बँकेच्या महत्त्वाच्या सेवा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या 44 कोटी ग्राहकांना महत्त्वाची सूचना जारी केली आहे. बँकेने ही महत्त्वाची सूचना दिली आहे जेणेकरुन ग्राहकांचा कोणताही खोळंबा होणार नाही, आणि वेळेत त्यांना त्यांची आवश्यक कामं पूर्ण करता येतील. SBI ने ट्वीट करत माहिती दिली आहे की बँक आज आणि उद्या काही सेवा बंद ठेवणार आहे.

एसबीआयने ट्विटरवर अशी माहिती दिली आहे की, सिस्टम मेंटेनन्ससाठी 16 आणि 17 जुलै रोजी काही सेवा बंद राहणार आहेत. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, Yono, Yono Lite आणि UPI या सेवांचा समावेश आहे. एसबीआयने ट्वीट करत म्हटलं आहे की या सेवा 16 जुलै रोजी रात्री 10.45 ते 17 जुलै रोजी

रात्री 01.15 वाजेपर्यंत या सेवा बंद राहणार आहेत. जवळपास 150 मिनिटांसाठी या सेवा बंद असतील. एसबीआयने यामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी एसबीआयकडून ठराविक कालावधीनंतर मेंटेनन्स आणि अपग्रेडेशन केलं जातं.

याच पार्श्वभूमीवर या काही सेवा आज आणि उद्या बंद असणार आहेत. या दरम्यान यूपीआय ट्रान्झॅक्शन बंद राहतील. ग्राहकांचा बँकिंग अनुभव सुधारण्यासाठी अशाप्रकारे अपग्रेडेशन करण्यात येते आहे. याआधीही अनेकदा बँकेने सेवा बंद ठेवल्या होत्या.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!