Wednesday, October 27, 2021

पिकअपची दुचाकीला धडक; मुलाच्या डोळ्यादेखत आईनं सोडला जीव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एका पिकअप गाडीनं दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या मायलेकावर काळानं घाला घातला आहे. पिकअपने जोरदार धडक मारल्यानं, उंच फेकल्या गेलेल्या आईचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

जखमी तरुणाला अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्याच पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आष्टी पोलीस करत आहे.
रुक्मिणी संतोष बोडखे (वय-37) असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.

मृत रुक्मिणी ह्या गुरुवारी सकाळी आपला प्रवीण संतोष बोडखे याला घेऊन आष्टीवरून कड्याच्या दिशेनं आपल्या गावी चालल्या होत्या. दरम्यान वाटेत असणाऱ्या कडा सहकारी साखर कारखान्याजवळ पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव पिकअपनं दुचाकीला जोरदार घडक मारली. दुचाकीवर

पाठीमागे बसलेल्या रुक्मिणी बोडखे या उंच उडून रत्यावर पडल्या, तर दुचाकी पिकअपसोबत तब्बल 400 मीटर फरफटत गेली.या दुर्दैवी घटनेत रुक्मिणी यांचा जागीचं मृत्यू झाला. तर 21 वर्षीय मुलगा प्रवीणही या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात घडल्यानंतर आसपासच्या लोकांनी जखमी प्रवीणला त्वरित रुग्णालयात दाखल केलं. अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात सध्या प्रवीणवर उपचार सुरू आहेत.

याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
हेही वाचा-सांगली: तीन महिन्यातच मोडला संसार; कोरोनाच्या धास्तीनं अभियंत्यानं संपवलं जीवन
या घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांन पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!