Monday, October 25, 2021

छिंदम बंधू विरोधात अ‍ॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिवद्रोही श्रीपाद छिंदमने  एका टपरी चालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत तसंच जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी त्याच्यासह 4 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अहमदनगरच्या तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये अॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरुद्ध अपशब्द काढून छिंदम चर्चेत आला होता.. छिंदमच्या या बिनअकलेच्या कारवाया थांबत नाही. अहमदनगर निवडणुकीवेळी त्यांने ईव्हीएमची पूजा केली होती. तर आता एका टपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ करुन तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

आरोपी श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे आणि राजेंद्र म्याना यांच्याविरोधात नगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय… सदरची घटना 9 जुलै 2021 दिवशी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली…

पोलिसांचा तपास सुरु

याप्रकरणी टपरी चालक भागीरथ भानुदास बोडके यांनी फिर्याद दिली आहे… त्यांच्या फिर्यादीवरून छिंदमसह पाच जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत

गेल्या वर्षी श्रीपाद छिंदम गेल्या वर्षी अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीला पुन्हा उभा राहिला होता. अपक्ष उभ्या राहिलेल्या छिंदमचा निवडणुकीत त्याचा विजयही झाला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या तसबीरीला अभिवादन करत त्याने प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न केला होता.
छिंदमने गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपच्या

तिकीटावर रिंगणात उतरण्याची हिंमतही केली होती. परंतु मतदारांनी नाकारल्यामुळे तो विधीमंडळाची पायरी चढू शकला नाही.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!