Monday, October 18, 2021

निर्बंधांवर मुख्यमंत्री ठाम, कडक अंमलबजावणीच्या प्रशासनाला सूचना

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सर्वसामान्य नागरिकांसह यंत्रणांकडून मोठी बेफिकरी झाली होती. या पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या लाटेनंतरच्या अनलॉक प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावध भूमिकेत असून त्यांनी प्रशासनाला आक्रमक सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील

सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी तसंच उद्योग क्षेत्रातील काही प्रतिनिधींशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. या बैठकीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याबाबत कोणतीच चर्चा झाली नाही, उलट कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

– कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ देऊ नका
– रस्त्यावर फिरणारे नागरिक मास्क घालूनच फिरतील याची दक्षता घ्या
– ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे त्या क्षेत्राला कंटेंमेंट झोन जाहीर करा
– कंटेंमेट झोनमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे कडक पालन करा

– गाव, वाड्या वस्तींवर लक्ष केंद्रीत करा
– कोरोनामुक्त गाव संकल्पनेत चांगले काम होईल यादृष्टीने प्रयत्न करा
जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावं आणि परिपूर्ण आराखडा तयार करावा, तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी कामगारांसाठी कंपन्यांच्या समन्वयातून उद्योगस्थळानजीक फिल्ड रेसिडन्शीयल एरिया निश्चित करण्यास

सहकार्य करावं, कामगारांना कामाच्या स्थळी जा-ये करण्यासाठी पाँईंट टू पॉईंट वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. ऑक्सिजन निर्मितीसाठी तसंच उद्योग सुरळीत सुरू रहावेत यासाठी उद्योजक करत असलेल्या सहकार्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!