Wednesday, October 27, 2021

या अभिनेत्रीचं 19 व्या वर्षी झालं होतं लैंगिक शोषण; सांगितला धक्कादायक अनुभव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आराधना शर्मा ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘स्प्लिट्सविला’ या रिअलिटी शोमधून नावारुपास आलेली आराधना आपल्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती यशाच्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परंतु तिचा इथपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता.

तिला प्रचंड संघर्ष करावा लागला. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण वयाच्या 19 व्या वर्षी तिचं लैंगिक शोषण देखील करण्यात आलं होतं.आराधना सध्या तारक मेहता उल्टा चष्मा या लोकप्रिय विनोदी मालिकेत झळकताना दिसतेय. यामध्ये तिने साकारलेल्या डिटेक्टिव्हच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय. या भूमिकेच्या निमित्तानं टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आराधनानं हा थक्क

करणारा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “ही घटना मी आयुष्यभर विसरू शकत नाही. त्यावेळी 19 वर्षाची होते. पुण्यात शिक्षण घेत असताना मी डॉडलिंग देखील करत होते. मुंबईतील एक व्यक्ती एका प्रोजेक्टसाठी कास्टिंग करत असल्याचं मला कळालं. मात्र त्याला आणखी काही रोल कास्ट करायचे असल्याने आम्ही रांचीतील माझ्या मूळ गावी भेटलो.

आम्ही स्क्रिप्ट वाचत होतो आणि त्याने मला विचित्रपणे स्पर्श करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मला काही कळलं नाही. पण नंतर त्याचा इरादा माझ्या लक्षात आला. परिणामी मी त्याला धक्का दिला. आणि तेथुन पळून गेले. तो अनुभव आठवून आजही मला रडू येतं.”

पुढे ती म्हणाली, “खरं तर मी त्याला जाब विचारणार होते. परंतु कुटुंबीयांनी मला थांबवलं.” करिअरची सुरुवात झाली तेव्हा आराधना थोडी जाड होती त्यामुळे बॉडिशेमिंगचा अनुभव देखील तिला आहे. परंतु नंतर तिने योग्य डाएट आणि व्यायाम करून आपलं अतिरिक्त वजन कमी केलं.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!