Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यात कोरोना वाढत असतानाच घडला धक्कादायक प्रकार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :कोरोना नियमांचा फज्जा उडवत तालुक्यातील शिरापूर येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीमुळे जवळपास दोन हजार जणांची गर्दी झाली होती. याबाबत माहिती मिळताच पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी घटनास्थळी दाखल होत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

त्यानुसार पारनेर पोलिस स्टेशनमध्ये आयोजकांसह इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या पारनेर तालुक्यात सर्वात वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे तालुक्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. असे असतानाही नियम धाब्यावर बसवत शिरापूर येथे बैलगाडी शर्यत भरवण्यात आली होती.

ही माहिती मिळताच देवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी शर्यतीचे आयोजक पळून गेले. मात्र, या बैलगाडीच्या शर्यतीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.या व्हिडिओ वरून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार ग्रामविकास अधिकारी मीना जनार्दन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शर्यतीचे आयोजक व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदार ज्योती देवरे म्हणाल्या:
‘शिरापूर येथे बैलगाडी शर्यत चालू असल्याचा फोन आला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झाले, असता नुकत्याच शर्यती होऊन गेल्या असल्याच्या खुणा व पिवळ्या रंगाचा कलर दिसून आला. पाहणी करून ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता सर्व लोक पळून गेले.

तेथे फेटे व शर्यती मधील सहभाग घेतलेल्यांच्या नावाच्या याद्या व हिशोबाचे रजिस्टर आढळून आले. तेथील शिपाईच्या मोबाईलमध्ये बैलगाडा शर्यतीचे व्हिडिओ आढळून आले. पोलिसांना याबाबत माहिती देऊन गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!