Saturday, October 23, 2021

आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मोठी घोषणा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोल्हापूर येथील राजर्षी शाहू ब्लड सेंटरच्या नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रमात या समारंभाला आमदार ऋतुराज पाटील, महेंद्र परमार, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, माजी महापौर आर.के.पोवार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शासकीय रुग्णालयांमध्ये समाजातील गरजू व्यक्ती उपचार घेतात. त्यांना अचानक रक्ताची आवश्यकता भासल्यास तात्काळ रक्ताची बॅग विकत घेणे शक्य नसते. त्यामुळे शासकीय दवाखान्यातील रुग्णांना मोफत रक्त देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजर्षी शाहू ब्लड सेंटरच्या नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रमात ते आज बोलत होते.

जिल्ह्यात ४५ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या राजर्षी शाहू ब्लड बँक संस्थेने नवीन वास्तू उभारली आहे. या वास्तूचे उद्घाटन आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक व्ही.बी. पाटील यांनी केले.‌ आपल्या मनोगतात त्यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला.

तसेच खासगी ब्लड बँक भेटवस्तूचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करतात व पुणे मुंबईमध्ये चढ्या दराने रक्ताची विक्री करतात त्यांच्या रक्त संकलनाचा जिल्ह्याला कोणताही फायदा होत नाही याला सरकारने आवर घातला पाहिजे. अशी तक्रार केली.

यावेळी मंत्री टोपे म्हणाले, ‘रक्ताची गरज किती असते हे रुग्णालयात गेल्याशिवाय कळत नाही. आजही शासकीय रुग्णालयांमध्ये असे गरजू रुग्ण असतात ज्यांना रक्ताची बॅग विकत घेणे शक्य नसते. यासाठी शासनाने शासकीय रुग्णालयातील रुग्णांना मोफत रक्त देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. खासगी

ब्लड बँकांनाही शासनाने नेमून दिलेल्या नियमाच्या चौकटीतच काम करावे लागेल. जो कोणी नियमाविरुद्ध काम करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे ही टोपे म्हणाले.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!