Monday, October 25, 2021

राज्यात 24 तासात वाढले इतके रुगण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या निर्बंधांमध्ये कोणत्याही प्रकारची सूट देण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. काही भागांमध्ये करोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याचं देखील दिसून येत असताना राज्य सरकारने मात्र सावध भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या करोना आकडेवारीमधून राज्यासाठी दिलासादायक बाब समोर आली आहे

. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये नव्याने आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनाव मात करून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा हा जवळपास दुप्पट असल्याचं दिसून आलं आहे. आज दिवसभरात एकूण ७ हजार ७६१ नवे करोनाबाधित आढळले असून त्या तुलनेत १३ हजार ४५२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

आज बऱ्या झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीनंतर राज्यात आजपर्यंत करोनावर मात केलेल्या एकूण रुग्णांचा आकडा आता ५९ लाख ६५ हजार ६४४ इतका झाला आहे. पण दुसरीकडे राज्यातील नव्या बाधितांची देखील आज भर पडली असून आजपर्यंत राज्यात करोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६१ लाख ९७ हजार ०१८ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख १ हजार ३३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यूदर स्थिर, मात्र घट होईना!

दरम्यान, राज्यात रिकव्हरी रेट आणि नव्या करोनाबाधितांची संख्या या बाबतीत काहीशी दिलासादायक परिस्थिती असली, तरी करोनामुळे होणारे मृत्यू ही अजूनही राज्य सरकारसाठी आणि आरोग्य प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरली आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये १६७ करोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर आज

अखेर २.०४ टक्के इतका नोंदवला गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात हाच मृत्यूदर कायम असून तो कमी न होणं हे मोठं आव्हान ठरलं आहे. राज्यात आजपर्यंत करोनामुळे १ लाख २६ हजार ७२७ मृत्यू झाले आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!