Monday, October 18, 2021

मोठी बातमी :पोलीस भरतीसंदर्भात, राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र पोलीस दलात हजारो पदांची भरती केली जाणार असून, गृह विभागाकडून शासन आदेश जारी केलाय. शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून 5 जुलै 2021 रोजी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आरक्षणाच्या अनुषंगानं धोरणात्मक बाबींचा निर्णय असल्यानं तो गृह विभागांतर्गत पोलीस भरतीसाठी लागू करणे आवश्यक आहे.

सदर शासन निर्णय गृह विभागाकडून रद्द करण्यात येत असून, पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह शिपाई आणि राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरती प्रक्रिया 2019 सामान्य प्रशासन विभागाच्या 5 जुलै 2021 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार राबवण्यात येणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी पोलीस महासंचालक यांनी तात्काळ करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असंही जीआरमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल, अशी घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे पाटलांनी केली होती. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबरपूर्वी

5200 पदांची भरती करणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने 7 हजरा पदे भरली जातील, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती.दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी 5200 जागांवर भरती केली जाईल, अशी घोषणा केली होती. तर, उर्वरित 7 हजार पदांची भरती नंतर केली जाईल

अशी माहिती दिली होती. औरंगाबाद येथे पोलीस दलाच्या अनुषंगानं विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं होतं.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!