Friday, October 22, 2021

नगरमधील त्या’ तीन डॉक्टरांचा जामीन नामंजूर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेत घोटाळा झाल्यानंतर याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखा करत असताना या तीन डॉक्टरांच्या खात्यामध्ये सहा कोटी चार लाख रूपये वर्ग झाल्याचे समोर आले होते.

यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना नगरमधून अटक केली होती. यानंतर नगर अर्बन बँकेच्या नगर शाखेत झालेल्या कर्ज फसवणूक प्रकरणी डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे व डॉ. रवींद्र कवडे या तीनही डॉक्टरांना वर्ग करून घेतले होते. त्यांना न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

शुक्रवारी त्यांच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. याच दरम्यान तीनही डॉक्टरांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्यांचे जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले आहे.दरम्यान नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अर्बन बॅक फसवणूक व अहमदनगर शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

या गुन्ह्यात डॉ. निलेश शेळके यालाही अटक करण्यात आली आहे. शहर सहकारी बँकेतील 17 कोटी 25 लाख रूपयांच्या बोगस कर्ज फसवणूक प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात राहुरी येथील डॉ. रोहिणी भास्कर सिनारे, श्रीरामपूर येथील डॉ. उज्ज्वला रवींद्र कवडे, नगरमधील डॉ. विनोद आण्णासाहेब श्रीखंडे यांनी प्रत्येकी पाच

कोटी 75 लाख रूपयांची फसवणूक झाल्याच्या स्वतंत्र फिर्यादी दिल्या आहेत.या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!