Monday, October 18, 2021

या’ गोष्टी करा, मुलांना होणार नाही कोरोना

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत बाधित मुलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पालकांनी लसीकरण करून घ्यावे आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही.

पालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळेल, अशी भीतीही आरोग्य विभागाने वर्तविली आहे. कोरोना हा लहान मुलांसाठी एवढा घातक नसेल, परंतु कोरोनातून बरे झाल्यानंतर दोन-तीन आठवड्यांपासून त्यांना अन्य आजारांना तोंड द्यावे लागत आहे.

श्‍वसनसंस्था, रक्‍ताभिसरण, पचन संस्थेवर परिणाम होत असून मेंदूज्वरदेखील होत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या कुटुंबातील मुले कोरोनापासून दूरच राहावीत, यादृष्टीने खबरदारी घ्यावी.मुलांची “अशी’ घ्यावी काळजी …दररोज सकाळी सूर्यनमस्कार, योगासन, सायकलिंग करावे अंडी, मटण, डाळी, उसळी, सोयाबीनचा आहारात वापर असावा

घरातील ताजे अन्न खावे; स्वयंपाक केल्यानंतर किमान 50 मिनिटात जेवण करावे पालकांनी स्वत:चे लसीकरण करून कुटुंब सुरक्षित करावे; मुलांना घेऊन विनाकारण घराबाहेर पडू नये लठ्ठ, बारीक असलेल्या विशेषत: पूर्वीचे गंभीर आजार असलेल्या मुलांचे औषधोपचार नियमित सुरू ठेवावे.

कामानिमित्त तथा विनाकारण घराबाहेर फिरताना नियमांचे काटेकोर पालन न केलेल्यांनाच कोरोनाने गाठल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेत आपल्यामुळे घरातील कोणाला संसर्ग होणार नाही, याची खबरदारी त्यांनी घ्यावी, असेही आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!