Wednesday, October 27, 2021

भाजपाच्या या आमदाराला अटक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कुरार मेट्रो स्टेशनच्या उद्घाटनासाठी एमएमआरडीएने मराठी माणसांची घरं तोडल्याचा दावा करत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

लोकांना मारहाण करून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगत आपण याविरुद्ध आवाज उठवला म्हणून आपल्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती भातखळकर यांनी दिली आहे. भातखळकर यांनी ट्वीट केलं असून, आरे पोलीस ठाण्यात घेऊन जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कुरार मेट्रो स्टेशनच्या कामामुळे बाधित होणाऱ्या मालाड पूर्व येथील सुमारे १५० रहिवाश्यांना मुंबई महानगरपालिकेनं घरे रिकामी करण्यासंदर्भात नोटीस दिल्या होत्या. त्यानंतर या घरांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणावरून अतुल भातखळकर यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्य सरकारवर टीका केली होती.

ही घरे एमएमआरडीएकडून पाडण्यात आली असून, आता अतुल भातखळकर यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.अतुल भातखळकर यांनीच ट्वीट करून माहिती दिली आहे. “ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्घाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे MMRDA ने तोडली. लोकांना प्रचंड मारहाण केली.

या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करून आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत”, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.“मराठी माणसाचं नाव घेऊन पक्षाचं दुकान चालवायचं आणि ज्या मेट्रो प्रकल्पात अडचणींचे डोंगर उभे केले; त्या प्रकल्पातील एका स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उद्ध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही? गिरगाव पॅटर्न का नाही?”, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

आयत्या पिठावर रेघोट्या आणि आयत्या बिळावर नागोबा… पैसे केंद्राचे, मेहनत देवेंद्र फडणवीस यांची आणि चमकोगिरी मेट्रोला कोलदांडा घालणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. त्यासाठी पोलीस बळाचा वापर करून तोडली गेली मराठी माणसांची घरं”, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.गिरगाव येथील बाधितांना जागेच्या इतकीच जागा स्थानिक ठिकाणी देऊन पुनर्वसन

करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना घेतला होता; त्याच धर्तीवर मालाड पूर्व येथील बाधितांचे सुद्धा पुनवर्सन झाले पाहिजे, अशी मागणी अतुल भातखळकर यांच्याकडून करण्यात आली होती.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!