Wednesday, October 27, 2021

या दोन तालुक्यांनी वाढवली संपूर्ण नगर जिल्ह्याची चिंता

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि संगमनेर तालुक्यातील कोविड रूग्णांची आकडेवारी चांगलीच वाढू लागली आहे. शनिवारी दुपारपर्यंत पारनेर तालुक्यात सर्वाधिक 111 तर त्या पाठोपाठ संगमनेर तालुक्यात 99 रूग्ण आढळले. नगर शहरात नवीन 28 कोरोना बाधित आढळले.

गेल्या काही दिवसांपासून कोविड रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेषतः ग्रामीण भागात ही वाढ होत असल्याने चिंतेची बाब आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीतही या संदर्भात चिंता व्यक्त करीत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 590 नवीन कोरोना बाधित आढळले.

यामध्ये पारनेर 111, संगमनेर 99, कर्जत 62, नगर ग्रामीण 42, शेवगाव 41, इतर जिल्हा 34, नगर शहर 28, पाथर्डी 25, अकोले 24, जामखेड 23, श्रीगोंदा 21, राहुरी 21, कोपरगाव 20, नेवासा 19, श्रीरामपूर 16, राहाता 14, भिंगार 10, मिल्ट्री हॉस्पीटल 01 अशी रूग्णसंख्या दर्शविण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील वाढती रूग्णसंख्या प्रशासनाने गांभिर्याने घेतली आहे. अद्यापही कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेले नियम पाळले जात नसल्याचे सर्रास आढळून येत आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिलेले आहेत.

तसेच तालुका यंत्रणांसह स्थानिय समित्यांसह सरपंच, पोलीस पाटील आदींनाही रूग्णसंख्येला आळा बसेल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!