Monday, October 18, 2021

कोरोनापासून दिर्घकाळ बचाव करण्यासाठी लसीचा तिसरा डोस?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जगभरातल्या बऱ्याच देशांना संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट  वेगानं पसरत आहे. यामुळे आजकाल बरेच तज्ज्ञ लस म्हणजेच ‘बूस्टर शॉट’  च्या तिसर्‍या डोसबद्दल बोलत आहेत.

लसीच्या तिसऱ्या डोसमुळे कोरोनाचा संसर्ग बराच काळासाठी थांबवला जाऊ शकतो. दरम्यान सद्यपरिस्थितीत वॅक्सिनच्या बूस्टरची गरज नसल्याचंही काही तज्ज्ञांचं मत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला फायझरनं म्हटलं होतं की, आम्ही अमेरिका आण युरोपातील अधिकाऱ्यांसाठी लसीच्या तिसऱ्या डोससाठी अधिकाऱ्यांची परवानगी मागणार आहोत.

लसीच्या तिसऱ्या डोसमुळे लोकांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी जास्त इम्युनिटी वाढेल, असं त्यांचं म्हणणं आहे. यावर कंपनीनं म्हटलं की, लसीचे दोन डोस कमीतकमी 6 महिन्यांपर्यंत लोकांना कोरोना संक्रमणापासून वाचवू शकतील.ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशांसाठी वैद्यकीय संस्था तिसऱ्या डोसची शिफारस करेल असे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.

युरोपियन मेडिसीन एजन्सी आणि युरोपियन सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचं म्हणणं आहे की, तिसऱ्या डोसची गरज आहे की नाही हे सांगणं आता खूप घाईचं ठरेल. लसीपासून संरक्षण किती काळ टिकेल हे समजण्यासाठी अद्याप लसीकरण मोहिमेचा आणि चालू असलेल्या अभ्यासाचा पुरेसा डेटा उपलब्ध नाही, असे वैद्यकीय संस्थांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

 

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!