Wednesday, October 27, 2021

मोठी बातमी :छिंदम विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यास गृह विभागाची परवानगी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद शंकर छिंदम (वय ३५) याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास गृहविभागाने परवानगी दिली आहे.

गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी त्यासंदर्भात आदेश काढले असून ते तोफखाना पोलीस स्टेशनला प्राप्त झाले आहेत. शासकीय पदावर असल्या कारणाने भादंवि कलम १९६ (१) (अ) प्रमाणे तोफखाना पोलिसांनी गृह विभागाकडे दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मागितली होती.

येत्या दोन दिवसांत छिंदम विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे करीत आहेत. फेब्रुवारी २०१८ मध्ये छिंदम हा उपमहापौर असताना महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी

भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून वाद घातला. त्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरले. अपशब्दांची ही ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाली. त्याचे राज्यभर पडसाद उमटले. अहमदनगर शहरात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. छिंदमचे नगरसेवक पद रद्द व्हावे,

यासाठी महापालिकेच्या सभागृहात ठराव झाला. हा ठराव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. राज्यात भाजप सरकार होते. त्यावेळी ठरावावर निर्णय झाला नाही. विधान परिषदेचीही निवडणूक लढवली. त्यात त्याचा पराभव झाला होता.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!