Monday, October 25, 2021

नगर ब्रेकिंग:घरातून बाहेर पडला आणि त्या एका तारेमुळे जीव गमावला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:घराजवळील खांबावरील तुटून पडलेल्या वीजवाहक तारेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे शुक्रवारी पहाटे घडली. तर तरुणाला सोडवण्याचा प्रयत्न करणार्‍या भाऊ व वडीलही वीजेचा शॉक लागून जखमी झाले.

घटनेतील मयताचे नाव योगेश बळीराम जायभाय (वय 23) असे आहे. या घटनेने जामखेड तालुक्यातून हळहळ व्यक्त होत असून महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.या बाबत समजलेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील तरुण योगेश बळीराम जायभाय हा पहाटे 6 वाजेच्या दरम्यान झोपेतून उठून नेहमीप्रमाणे शौचालयाला जात होता.

दरम्यान घराजवळ असलेल्या वीजवाहक खांबावरील तुटून पडलेली तार त्याला न दिसल्याने त्याचा तारेवर पाय पडल्याने त्याला वीजेचा शॉक लागला. त्याने आरओरडा केल्याने घरातून त्याचे वडील बळीराम जायभाय व भाऊ गोकुळ जायभाय पळत आले. त्यांनी त्याला वीजेच्या तारेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनाही वीजेचा शॉक लागल्याने तेही जखमी झाले.

या घटनेमध्ये वडील बळीराम जायभाय हे बेशुद्ध झाले तर भाऊ गोकुळ जायभाय याचा हात भाजला. दरम्यान शेजारी राहणारे नातेवाईकांनी दोरीच्या साह्याने वीजवाहक तार बाजुला ओढून योगेश याला बाजुला केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांनी मयत योगेशचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.शुक्रवारी दुपारी उशीरा वंजारवाडी योगेश याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!