Monday, October 18, 2021

नगर जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात कारणातून आलेल्या नैराश्यामुळे २२ वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी घडली.संकेत बाळासाहेब काळे (वय २२, रा.खडकी रोड, सारोळा कासार) असे या मयत तरुणाचे नाव आहे.

शुक्रवारी (दि.१६) त्याचे आई-वडील व घरातील इतर कुटुंबिय शेतात कामासाठी गेलेले असताना सायंकाळी 5 च्या सुमारास त्याने घरातील छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घराबाहेर बसलेल्या त्याच्या वृद्धा आजीच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तिने आरडाओरडा करुन शेजार्‍यांना बोलविले.

मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. नगर तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप बोडखे, पो.कॉ. राजेंद्र ससाणे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर गावातील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत संकेत याच्या पश्चात आई-वडील, 1 भाऊ, आजी-आजोबा असा परिवार आहे.

 

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!