Monday, October 18, 2021

राष्ट्रवादीच्या या खासदारांचे मोठं विधान: म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट व नारायणगाव बायपासच्या उद्घाटनावरून पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात दोन दिवस चांगलाच राजकारण पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आज या दोन्ही बायपासचे आज उद्घाटन केले.

मात्र काल म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी या बायपासचे शिवसैनिकांना घेऊन अचानक उद्घाटन केल्याने राज्यात असलेली सेना राष्ट्रवादीच्या महाआघाडीत इथे मात्र बिघाडी दिसून आली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आमच्याही मनात आदर आहे. 100 टक्के आदर आहे.

मात्र ते मुख्यमंत्रिपदावर आहेत ते आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे’ असं म्हणत राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना सणसणीत टोला लगावला.आज शनिवारी सकाळी खेड बायपास व दुपारी नारायणगाव बायपासची अधिकृत उद्घाटने करत डॉ कोल्हे यांनीही आढळराव यांच्यावर चांगकीच बोचरी टीका केली.

माजी आमदार शरद सोनवणे व माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्यावर कोटी केली. “निवडणुकीनंतर पद गेल्यानंतरची ही अस्वस्थता राज्यात अनेकांना आहे. दुर्दैवाने शिरुरमध्ये सुद्धा आढळराव बैचेन आहेत. त्यातूनच त्यांनी हे काल हे उद्घाटन केलंय. इतक्या वयस्कर व्यक्तीने असं वागणं बर नाही.” असं म्हणत टोला लगावला.

 

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!