Monday, October 25, 2021

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना इशारा! हे काम केलं नाहीत तर 10000 रुपये दंड भरा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. एसबीआयने असे म्हटले आहे की तुमच्या पॅन कार्डाशी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य आहे. याआधी पॅन-आधार लिंक करण्याची तारीख अनेकदा वाढवण्यात आली आहे. आता ही डेडलाइन 30 सप्टेंबर 2021 आहे.

त्यापूर्वी तुम्ही हे काम पूर्ण न केल्यास अनेक आर्थिक कामांचा खोळंबा होऊ शकतो.30 सप्टेंबरपूर्वी पॅन-आधार लिंक न केल्यास तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकतं. अर्थात तुम्ही कोणत्याही कामाकरता त्या कार्डाचा वापर करू शकत नाही. आयकर, इन्कम टॅक्स रिटर्न, विविध बँकिंग सेवा, सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते.

अशावेळी जर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले तर तुमच्या महत्त्वाच्या कामांचा खोळंबा होऊ शकतो.SBI ने केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘आम्ही ग्राहकांना असा सल्ला दतो की त्यांनी त्यांचे पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करावे, जेणेकरुन कोणतही असुविधा होणार नाही आणि त्यांना अडथळा न येता बँकिंग सेवा अनुभवता येतील.

का द्यावा लागेल 10000 रुपयांचा दंड?
तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास दंड भरावा लागण्याचीही शक्यता आहे. तसंच पॅन कार्ड पुन्हा सक्रीय करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपयांची लेट फीज देखील द्यावी लागेल. पॅन कार्ड निष्क्रिय झाले म्हणजे असे मानण्यात येईल की कायद्यानुसार पॅन कार्ड कोट करण्यात आले नाही. त्यामुळे आयकर कायदा 272B अंतर्गत 10000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.

ऑनलाइन करता येईल लिंक
तुम्ही इन्कम टॅक्सच्या नवीन वेबसाइटच्या आधारे माहित करुन घेऊ शकता की तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही. जाणून घेण्याकरते तुम्ही इन्कम टॅक्स वेबसाइटवर जा, त्याठिकाणी आधार कार्डावरील नाव, तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा. आधार कार्डवर केवळ जन्माचं वर्ष असेल तर तसा पर्याय निवडा.

कॅप्चा टाकून लिंक आधारवर क्लिक करा. अशाप्रकारे सोप्या पद्धतीने तुमचं आधार पॅन कार्डशी लिंक होईल.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!