Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यातील कारला आणे घाटात अपघात, 1 ठार 3 जखमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :चारचाकी वाहनाने पुणे जिल्ह्यातील भिंमाशंकर येथे पर्यटनाला जाणाऱ्या नेवाशातील युवकांचा नगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील आणे घाट येथे अपघात झाला असून या अपघातात 1 जण ठार तर 3 जन जखमी झाले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पाच युवक शनिवार रविवार सुट्टी असल्याने स्विफ्ट कारने शुक्रवारी रात्री नेवासा येथून पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, शिवनेरी या ठिकाणी फिरण्यासाठी जात होते.पुणे जिल्ह्यातील आणे गावाजवळील आणे घाटातून आळेफाटाकडे जाताना घाटात पाऊस चालू

असल्याने व धुके असल्याने रस्त्याचा अंदाज आला नाही आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या दगडावर स्विफ्ट गाडी धडकली. या अपघातात नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथील 24 वर्षीय युवक अमोल रमेश लोखंडे हा ठार झाला तर स्विफ्ट गाडीतील तीन जण गंभीर, एक जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताचा पुढील तपास आळेफाटा पोलिस .

 

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!