Friday, October 22, 2021

सहकाराची तत्त्वे पायदळी तुडवू नका-शरद पवार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नवी दिल्ली

केंद्र सरकारने सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी बँकिंग नियमन कायद्यामध्ये दुरुस्ती केली होती. ही दुरुस्ती राज्यघटनेच्या सहकाराच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारी आहे. सहकारी संस्थांबाबत केंद्राने तयार केलेला कायदा आणि राज्य सरकारच्या कायद्यांतील तरतुदी परस्परविरोधी आहेत. रिझर्व्ह बँकेचा सहकारी बँकांच्या कामकाजात हस्तक्षेप वाढला असून कायदा दुरुस्तीचा हेतू स्वागतार्ह असला तरी अतिउत्साही नियमनाच्या नावाखाली राज्यघटनेने आखून दिलेली सहकाराची तत्त्वे पायदळी तुडविली जाऊ नयेत, असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

खा.शरद पवार यांनी काल शनिवार दि. १७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि राजनाथ सिंह या सरकारमधील महत्त्वाच्या मंत्र्यांची शुक्रवारी भेट घेतल्यानंतर पवार शनिवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्याने देशासह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. केंद्राचे नवे सहकार खाते, बँकिंग नियमन कायद्याचा सहकारी बँकांवर होणारा परिणाम आणि कोरोना काळात राज्यांना केंद्राकडून अपेक्षित असलेली मदत याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत जवळपास तासभर चर्चा केली. यानंतर स्वतः शरद पवार यांनीही ट्विट करून या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील जाहीर केला. पंतप्रधान मोदींशी राष्ट्रीय हिताच्या विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रात नव्याने अस्तित्वात आलेल्या सहकार मंत्रालयाचा मुद्दा देखील या वेळी चर्चेच्या केंद्रस्थानी होता. नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात सहकार हे नवे मंत्रालय स्थापन करण्यात आले असून, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे हे खाते देण्यात आले आहे. बँकिंग नियमन कायद्यातील सुधारणांचा सहकारी बँकांच्या कार्यपद्धतीवर कशा प्रकारे विपरीत परिणाम होत आहे, ही बाब शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या लक्षात आणून दिली. याबाबतचे सविस्तर माहिती देणारे पत्रही त्यांनी पंतप्रधानांना सुपूर्द केले. देशातील कोरोनाच्या संसर्गाचे संकट अद्याप संपलेले नाही, आता तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यांना केंद्राकडून कशाप्रकारे मदत मिळाल्यास या संकटाचा प्रभावीपणे मुकाबला करता येईल, यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

*समभागधारकांचा मार्ग बंद...

सहकारी बँकांनी इक्विटी,समभागांद्वारे लोकांकडून भांडवल उभारण्याबाबत तसेच त्याच्या नियमनाबाबत केंद्राच्या आणि राज्य सरकारांच्या सहकारी कायद्यांमध्ये भिन्नता आहे. हाच प्रकार सभासदांना समभाग परत देण्याबाबतही दिसतो. केंद्राचा कायदा थकबाकी नसतानाही सभासदांना समभाग परत देण्यास नकार देणारा आहे. यामुळे सहकारी बँकांच्या समभाग धारकांना समभाग विकून बाहेर पडण्याचा मार्ग बंद करणारा आहे.

*रिझर्व्ह बँकेचा हस्तक्षेप वाढला…

लेखापरीक्षकांची नियुक्ती, लेखापरिक्षण, संचालक मंडळाचा कालावधी, मुख्य कार्यकारी अधि पदमुक्ती, यासारख्या मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींमध्ये आणि राज्यांच्या सहकारी संस्था कायद्यांमधील तरतुदींमध्ये तफावत आहे. शरद पवार यांनी नेमका यालाच आक्षेप घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचा सहकारी बँकांच्या कामकाजात हस्तक्षेप वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!