Saturday, October 23, 2021

‘ईडी’ला मी घाबरत नाही-जयंत पाटील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सक्त वसुली संचालनालयाची (ईडी) भीती वाटण्याचा प्रश्नच नाही. नोटीस आलेले लोकही घाबरलेत, असा गैरसमज करून घेऊ नका. लोकांना पावरविण्यासाठीच इंडीचा वापर केला जात आहे. राजकीय क्षेत्रातील लोकांच्या मागे लागून त्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न होत आहेत,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला.

खोटे आरोप करून राष्ट्रवादीच्या नेत्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे जनतेच्या लक्षात येत आहे. राष्ट्रवादी बॅकफूटवर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री पाटील शुक्रवारी साताऱ्याच्या दौन्यावर होते. या वेळी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट देऊन ईडीच्या चौकशीविषयीची अधिक माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कारवाईतून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे का, त्यातूनच राष्ट्रवादी बॅकफूटवर असल्याचे विरोधकांतून बोलले जात — आहे, याविषयी विचारले असता मंत्री पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी बॅकफूटवर नाही, पण जाणीवपूर्वक खोटे आरोप करून राष्ट्रवादीच्या नेत्यांना अडचणीत आणून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

महाराष्ट्रातील सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणून त्यांच्यावर सीबीआय इंडीच्या माध्यमातून चौकशीचा ससेमिरा लावायचा. सरकारला जे जे शक्य आहे, ते ते करायचे असा कार्यक्रम त्यांनी ठरविल्याचे दिसते. आमचे कोणतेही सहकारी दोषी दिसत नाहीत. इंडीने सांबीआयने चौकशी केलेली आहे. त्याचा तपशील सोयीस्करपणे जाहीर केला जात आहे.

त्यातील सर्व तपशील बाहेर आला तर त्यातून नेमकी परिस्थिती दिसून येईल. अनिल देशमुखांच्या केसमध्ये काही वर्षापूर्वी त्यांनी कुठे तरी जमीन घेतली असेल, तिची किंमत आजच्या घडीने वाढवून लावत खोटे आरोप केले जात आहेत. हे सर्व धादांत खोटे आहे. याचा करता करविता कोण आहे, ते जनतेच्या लक्षात आले आहे. महाराष्ट्रातील सत्ता मिळविण्यासाठीच त्यांचा हा प्रयत्न आहे.”

जितेंद्र आव्हावाबद्दल पाटील म्हणाले, “त्यांच्याविषयी तक्रार असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी. त्यांनी चर्चा केल्यानंतर समज- गैरसमज दूर झाला तर ठिक आहे. तीन पक्षाच्या सरकारमध्ये अशा छोट्या- मोठ्या गोष्टी आम्हाला महत्त्वाच्या वाटत नाहीत, तीनही पक्ष एकसंधपणे राज्य चालवत आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या समाधानाला उतरलेले हे सरकार आहे.”

शिफारशी करण्याचा अधिकार…

विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे. या प्रश्नावर ते म्हणाले, “आमच्या बाजूने सर्व प्रक्रिया करून आम्ही यादी राज्यपालांकडे पाठविली आहे. आता प्रश्न राज्यपालांकडे प्रलंबित आहे. महाराष्ट्रात अशा पद्धतीचा प्रश्न यापूर्वी कधीही आलेला नाही. विलंब का लागतोय, हा प्रश्नच असून राज्य सरकारला शिफारशी करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारावर गदा येतेय का असा प्रश्न आहे. राज्य सरकारने राज्यपालांना आठवण करून दिलेलो आहे.”

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!